रोटरी चोपडा तर्फे १०० % मतदान रोटरी सदस्यां मधील ७७ वर्षीय ज्येष्ठ रोटेरियन एम . डब्ल्यू . पाटील यांनी उत्साहाने सकाळी सपत्नीक मतदानाचा स...
रोटरी चोपडा तर्फे १०० % मतदान
रोटरी सदस्यां मधील ७७ वर्षीय ज्येष्ठ रोटेरियन एम . डब्ल्यू . पाटील यांनी उत्साहाने सकाळी सपत्नीक मतदानाचा सेल्फी टाकून सर्व सदस्यां चा उत्साह वाढविला
प्रतिनिधी : चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
मतदानाची टक्केवारी वाढविणे साठी शासन व विविध सेवाभावी संघटनांनी सर्वत्र प्रयत्न केले . होते . ह्या जनजागृतीच्या प्रयत्नात चोपडा रोटरी क्लब व कै . आमदार डॉ सुरेशदादा पाटील नर्सिंग कॉलेजने देखील चोपडयात मुख्य रस्त्यांवरून पायी पदयात्रा / रॅली काढून आपले योगदान दिले होते .
त्या नुसार काल १३ मे रोजी झालेल्या ४ थ्या टप्यातील रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीत चोपडा रोटरी क्लबने आपल्या सर्व सदस्यांचे सहकुटुंब मतदान पार पाडणे साठी रोटरीच्या व्हॉट्स अप समूहावर मतदान केल्याचे सह कुटुंब सेल्फी टाकत 'आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा ' असे संदेश टाकत जागृती केली . रोटरी सदस्यां मधील ७७ वर्षीय ज्येष्ठ रोटेरियन एम . डब्ल्यू . पाटील यांनी उत्साहाने सकाळी सपत्नीक मतदानाचा सेल्फी टाकून सर्व सदस्यां चा उत्साह वाढविला . दुपारी १२ वाजता न .प . चोपडा आवारात न . प . मुख्याधिकारी राहूल पाटील यांच्या समवेत रोटरी प्रेसिडेंट चेतन टाटिया, सचिव रोटे अर्पित अग्रवाल तसेच एम डब्ल्यू पाटील, आशीष गुजराथी, नितीन अहिरराव, अभियंता विलास एस पाटील, संजय शर्मा, विलास पाटील, तेजस जैन, पवन गुजराथी, विपुल छाजेड,आरिफ शेख,प्रदीप पाटील,धीरज अग्रवाल,चंद्रशेखर साखरे,विलास कोष्टी, अनिल अग्रवाल, सुरेखा मिस्त्री,लीना पाटील.... यां सह अनेक सदस्यांनी एकत्रित येत आम्ही मतदान केले तुम्हीही मतदान करा असा संदेश देत उर्वरित सदस्यांना प्रोत्साहित केले . मतदान संपेपर्यंत जवळ पास सर्व रोटरी सदस्य व कुटुंबियांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले .

No comments