नालीवर गवताची लहर त्यात सापांची कहर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण लोनवडी ग्रामपंचायत घेत आहे या विषयाकडे झोपेचे सोंग अमोल बावस्कार मलकापूर...
नालीवर गवताची लहर त्यात सापांची कहर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
लोनवडी ग्रामपंचायत घेत आहे या विषयाकडे झोपेचे सोंग
अमोल बावस्कार मलकापूर प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- तालुक्यातील ग्राम लोनवडी येथे ग्रामपंचायत जवळ कोळी समाज मंदिराला लागून वार्डातील निघणारी नाली पुढे नाल्याकडे जात असून त्या नालीची नाल्यापर्यंत अद्यापही साफ सफाई झाली नसून त्यात प्लास्टिक बॉटल, कचरा,पिशव्यामुळे दुर्गंध पसरत असून त्यावरती व रस्त्यात पूर्ण गवताची वाढ झाली असता डासांचे प्रमाण वाढून बिमारीचे लक्षण दाट वाढण्याची शक्यता आहे तर त्या गवतात साप आढळत असण्याने शेजारी व पादचारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले कोळी समाज मंदिराजवळ बसणारे नागरिक व शेजाऱ्यांना याचा सामना करावा लागत असून ही बाब त्यांनी कोळी समाज सेवेत असणारे वार्ड सदस्य क्रीष्णा बावस्कार यांच्या लक्षात आणून त्यांनी हा विषय ग्रामपंचायत मध्ये वारंवार सांगितला असून वरिष्ठ दोन दिवस मध्ये करू असे पंधरा दिवसांपासून सांगत आले ग्रामपंचायत वरिष्ठ जर वार्ड सदस्य यांनाच आश्वासन देऊन काम करत नाही देत तर सामान्य नागरिकांचे काय समाधान करणार व गावातील नाल्यांची साफ सफाई होणार की नाही हा नागरिकांमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे.



No comments