आसेमं चा १९ मे रोजी २७ वा सामुहिक विवाह सोहळा तडवी भिल समाजातील वरवधूंना विवाह नोंदणी चे आसेमं परिवाराचे आवाहन फाईल चित्र ...
आसेमं चा १९ मे रोजी २७ वा सामुहिक विवाह सोहळा
तडवी भिल समाजातील वरवधूंना विवाह नोंदणी चे आसेमं परिवाराचे आवाहन

फाईल चित्र
प्रतिनिधी सावदा/मुबारक तडवी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
अविरत २७ वर्षांपासून (शेकडो) विवाह लावण्याचा विक्रमी ध्येय सुरूच व सामुहिक विवाह सोहळा पुढेही अखंडपणे सुरू ठेवण्याचा आसेमं संघटना परिवाराचा मानस प्रतिनिधी सावदा/मुबारक तडवी. आसेमं आदिवासी सेवा मंडळ संचलित व आयोजित तडवी भिल समाजाचा दरवर्षी प्रमाणे अखंडित २७वा सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे लग्न सोहळ्यात होनारा अमाप बॅन्ड वाजा वर्हाडी जेवणावळी अशा अनेक बाबींवर होनार्या अवाजवी खर्च टाळण्यासाठी तसेच वधू वर कुटुंबाना आधार व्हावा म्हणून आसेमं आदिवासी सेवा मंडळ संचलित आसेमं परिवारातर्फै ्तडवी भिल समाज सामाजिक सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते सलग २७ वर्षापासून आजतागायत अखंडपणे सुरू असलेल्या या सामुहिक विवाह सोहळा द्वारे आजपर्यत एकूण एक हजार आठशे सतरा(१८१७ )वधूवर नववधू वरांच्या लग्नाची रेशीम गाठी बांधल्या गेल्या सर्वधर्मीय दानशूर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचा सहकार्य व मदतीने या सामुदायिक विवाह सोहळा चे आयोजन केले जाते आसेमं परिवार तर्फे आयोजित या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती असते सामाजिक उपक्रम,समाजकार्य, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवले प्रतिनिधी यांचा मान सन्मान सत्कार केला जातो पुरस्कार देऊन गौरविण्यात येते अशा विविध समाजोपयोगी उपक्रमात आसेमं परिवार आदिवासी सेवा मंडळ संचलित सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त संख्येने नववधू वर यांनी आसेमं कार्यालयात किंवा आपल्या गावातील आसेमं सेवक कार्यकर्ते यांचेकडे दि १८ मे पर्यत विवाह नोंदणी करुन विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी प्रदेशाध्यक्ष कामील नामदार तडवी कर्मचारी महासंघ प्रदेशाध्यक्ष ईरफान तडवी, जिल्हाध्यक्ष मुबारक अलीखाँ तडवी,बि राज तडवी वसीम महेबुब आदी सह आसेमं परिवार तर्फे केले आहे
No comments