खिर्डी येथे आर्किटेक दिपक चिम यांचा सत्कार. राष्ट्रीय स्तरावर मिळाले दोन पुरस्कार. आपल्या परिसरातील मुक्ताईनगर येथील आर्किटेक...
खिर्डी येथे आर्किटेक दिपक चिम यांचा सत्कार.
राष्ट्रीय स्तरावर मिळाले दोन पुरस्कार.
आपल्या परिसरातील मुक्ताईनगर येथील आर्किटेक यांना राष्ट्रीय स्तवर पुरस्कार मिळणे कौतुकास्पद बाब
रावेर तालुका प्रतिनिधी : मुबारक तडवी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे मस्जिद ए ताजुशशरीया ट्रस्ट तर्फे आर्किटेक दिपक चिम यांना भारतातील सर्वोत्तम २५ प्रोमिसिंग आणि ट्रेंडसेटर अर्कीटेक्ट आणि इंटेरियर डिझाईनर ऑफ द इयर २०२४ व फ्युचरस्टिक्स आणि ट्रस्टेड आर्किटेकचरल प्लानिंग आणि इंटेरियर डिझाईनर फर्म ऑफ द इयर २०२४ अश्या दोन राष्ट्रीय पुरस्काराने बँगलोर(कर्नाटक) येथे सम्मानित करण्यात आले असून आपल्या परिसरातील मुक्ताईनगर येथील आर्किटेक यांना राष्ट्रीय स्तवर पुरस्कार मिळणे कौतुकास्पद बाब असल्यामुळे त्या निमित्ताने येथील मस्जिद ट्रस्ट यांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी इरफान भाई(औरंगाबाद)डॉ.आदिल (पुणे),साजिद अंसारी (भिवंडी) तसेच मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
No comments