चोपडा भारतीय बौद्ध महासभेचे वतीने त्यागमूर्ती माता रमाईना अभिवादन चोपडा: प्रतिनिधी (संपादक: हेमकांत गायकवाड) चोपडा येथे दि.बुध्...
चोपडा भारतीय बौद्ध महासभेचे वतीने त्यागमूर्ती माता रमाईना अभिवादन
चोपडा: प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे दि.बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व तालुक्याच्या वतीने दि.२७ मे २०२४ त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्मृती दिवस साजरा करून अभिवादन करण्यात आले.माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस जानकीराम शंकर सपकाळे जेष्ठ मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा व मान्यवरांनी माल्यार्पण केले.यावेळी ॲड.विलास बाविस्कर,हितेंद्र बिरबल मोरे केंद्रिय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा यांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.अभिवादन कार्यक्रमास तालुकाध्यक्ष बापुराव गिरधर वाणे,शहर अध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ,कृष्णा प्रभाकर सोनवणे,सिद्धार्थ बारकू सपकाळे,संघर्ष गणेश सपकाळे आदी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र प्रल्हाद म्हैसरे यांनी केले.
No comments