४३ मतदारांनी घरबसल्या बजावला मतदानाचा अधिकार ८५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या ३६ मतदारांना आणि ९ दिव्यांग मतदारांना आज घरबसल्या आपल्या मतद...
४३ मतदारांनी घरबसल्या बजावला मतदानाचा अधिकार
८५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या ३६ मतदारांना आणि ९ दिव्यांग मतदारांना आज घरबसल्या आपल्या मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने त्यांना होम वोटिंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत कार्यरत असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघात गृह मतदान संपन्न झाले. ८५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या ३६ मतदारांना आणि ९ दिव्यांग मतदारांना आज घरबसल्या आपल्या मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने त्यांना होम वोटिंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.या एकूण ४५ मतदारांसाठी सात पथके तयार करण्यात आले. सदर मतदारांच्या घरी जाऊन या पथकांनी मतदान केंद्र तयार केले .सदर मतदान केंद्रात गुप्त पद्धतीने टपाली मतपत्रिकेद्वारे मतदारांनी आपले मत नोंदविले आहे. यापैकी ४३ मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. एकूण ९५.५५ टक्के मतदान पार पडले. ही संपूर्ण मतदान प्रक्रिया कॅमेराच्या छायाचित्रणांमध्ये पार पडली आहे.
सकाळी सात वाजेपासून या पथकांनी गृह मतदानाची प्रक्रिया सुरू केली. संध्याकाळपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा सदर साहित्य सुरक्षा कोठडीत जमा करण्यात आली आहे. सदर गृह मतदान पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने मेहनत घेतली.
सदर गृह मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट दिली. प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे,मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे, नोडल अधिकारी योगिता न्याहाळदे,सहाय्यक नोडल अधिकारी सतीश बोरसे, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments