वृक्ष लागवड कार्यक्रमाचा उद्देश हा झाडं जगवण्याचा नव्हे तर फोटो व प्रसिद्धीसाठीच असतो. तर अजून पाच वर्षात आपली संपत्ती,आपला पैसाही ,आपला ए...
वृक्ष लागवड कार्यक्रमाचा उद्देश हा झाडं जगवण्याचा नव्हे तर फोटो व प्रसिद्धीसाठीच असतो.
तर अजून पाच वर्षात आपली संपत्ती,आपला पैसाही ,आपला ए.सी सुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही.आपली भावी पिढी सुद्धा आपल्याला माफ करणार नाही.
गेल्या चार महिण्यापासून जस जसा पारा वाढत गेला तसं तसं सर्वाऩीच पोटतिडकीने सोशल मिडीयावर झाडे वाला ही संकल्पना मांडली आणि हो ती आवश्यकही आहे.पण मित्रांनो झाडं लावा हि संकल्पना नुसतं मांडून चालणार नाही.कारण शासनानेही तेहतीस कोटी झाडं लावली होती त्याचं काय झालं? सांगायचा उद्देश एवढाच झाडं नुसती लावली नाही तर ती जगवली गेली पाहीजेत.
माकडाचे घर ही गोष्ट आपण ऐकली असेलच पाऊस सुरू होतो माकडं चिंब भिजतं.थंडीने काकडून जातं तेव्हा ते विचार करत पाऊस थांबला की घर बांधायचच पण पाऊस थांबतो कोवळं ऊन पडतं आणि उड्या मारायला लागतं माकडाला घर बांधायची आठवणच पडते .परत पाऊस सुरू होतो पण माकडाचं घर बनवायचं राहूनच जातं तसच उन्हाळा संपला ,पावसाळा सुरू झाला, की आपल्याला वृक्ष लागवडीची आठवणच पडून जाते.
एक किस्सा आठवला म्हणून सांगतो.एका गावात ग्राम पंचायतच्या आवारामध्ये वृक्ष लागवडीसाठी गट विकास अधिकारी आले.साहेब नविनच बदली होऊन आले होते.साहेबांनी ग्रामसेवकाला बोलवले आणि म्हटले की हे खड्डे झाडे लावण्यासाठी योग्य नाहीत.तेव्हा ग्राम पंचायतीचा शिपाई पुढे आला आणि म्हणाला साहेब पहीले होते ते गट विकास अधिकारी गेली तीन वर्ष याच खड्यात झाडं लावत होते.ते कधीच बोलले नाहीत की ही खड्डे झाडं लावायला योग्य नाहीत.माझा सांगायचा अर्थ सर्वाऩा समजला असेलच.बहूतेक अधिकारी किंवा पुढारी यांचा वृक्ष लागवड कार्यक्रमाचा उद्देश हा झाडं जगवण्याचा नव्हे तर फोटो व प्रसिद्धीसाठीच असतो.म्हणून झाडे लावा ऐवजी झाडे जगवा हाच शब्द योग्य राहील.
बरं क्रिकेट खेळतांना आपण नुसती बँटींग जोरदार करून चालणार नाही तर मँच जिंकण्यासाठी फिल्डींगही महत्वाची आहे.सांगायचं तात्पर्य एवढच की फक्त झाडे लावून चालणार नाही तर रोज शेकडो झाडं तुटताहेत,तोडली जाताहेत,जाळली जाताहेत याचं काय? यासाठीही प्रयत्न होणं गरजेचं आहे.
बरं उन्हाळ्यात बहूतेक जण झाडं लावण्या विषयी लिहीतात पण पावसाळ्यात किती जण झाडे लावतात किंवा जगवतात.तसेच किती लोकं जगलेली झाडं तुटणार नाहीत यासाठी प्रयत्न करतात?
मित्रांनो पर्यावरण वाचवण्याची, जीवसृष्टी वाचवण्यासाठी हिच वेळ आहे.कारण आज पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानातच उष्माघाताने किती लोकांना जीव गमवावा लागला हे आपण पाहातच आहोत.अजून काही दिवसांनी हे तापमान पन्नास डिग्री सेल्सिअसवर पोहोचेल, तेव्हा तर अनेक जीव,पशु पक्षी मरून जातील. आहेत ती झाडे सुद्धा सुकून जातील तर नविन लावलेली झाडे जगण्याचा प्रश्नच राहाणार नाही.कारण परिस्थीती हातातून निघून गेेलेली असेल. पृथ्वीवरील पाणी नष्ट झालेले असेल .किमान आपल्या मुलांसाठी ,पुढच्या पीढीसाठी पर्यावरण वाचवा.नुसतं शासनाच्या भरवश्यावर न राहाता.प्रत्येकाने या पावसाळ्यापासून कुटूंबात जेवढे सदस्य आहेत त्याऩी प्रत्येकी पाच झाडे फक्त लावू नका तर ती जगवा.वृक्षतोड थांबवा.पाणी अडवा पाणी जिरवा व पाणी वाचवा.नाही तर अजून पाच वर्षात आपली संपत्ती,आपला पैसाही ,आपला ए.सी सुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही.आपली भावी पिढी सुद्धा आपल्याला माफ करणार नाही.
शब्दांकन
(राज्यस्तरीय पर्यावरण रत्न व ग्रीनमँन आवार्डचे मानकरी)चौगाव ता.चोपडा जि.जळगाव
मो.9823985631
No comments