adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पहूर महावितरण विभागातील भ्रष्टाचाराला उप कार्यकारी अभियंता योगेश इंगोले यांच्या कडून घातले जात आहे खत पाणी

  पहूर महावितरण विभागातील भ्रष्टाचाराला उप कार्यकारी अभियंता योगेश इंगोले यांच्या कडून घातले जात आहे खत पाणी _ _____________________________...

 पहूर महावितरण विभागातील भ्रष्टाचाराला उप कार्यकारी अभियंता योगेश इंगोले यांच्या कडून घातले जात आहे खत पाणी


_
________________________________


शासनाचा भला मोठा पगार घेवून बेजबाबदार अधिकारी व ठेकेदाराची मर्जी सांभाळन्यामध्ये उप कार्यकारी अभियंता पहूर अधिकच मग्न

_________________________________

_____________________________________


जामनेर : प्रतिनिधी 

संपादक : हेमकांत गायकवाड 

पहूर महावितरण विभागातील चाललेला अनागोंदी कारभार त्याकडे वरिष्ठ लक्ष द्यायला तयार नाहीत, कदाचित उन्हाचा पारा जास्त असल्याने वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून बाहेर निघायला घाबरत असावे.?याचाच फायदा उप कार्यकारी अभियंता पहूर योगेश इंगोले यांनी घेतला की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.शेंदुर्णी जामनेर रस्त्यावरील साईदीप हॉटेल समोरील उच्चदाब वाहिनीच्या नवीन तारा चोरीला गेल्या की काय.?या विषयाचे उत्तर योगेश इंगोले यांनी  दै माझा मराठवाडा वृत्त पत्र प्रतिनिधी यांना न दिल्याने दि. 13.03.2024.रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार प्रवीण तायडे यांनी माहिती अधिकार अर्जात पहूर पोलीस ठाणे समोरील रस्ता रुंदीकरणामुळे स्थलांतर झालेल्या विद्युत वाहिनीचे अंदाज पत्रक मागितले होते,माहिती अधिकार अर्जाचे चाळीस दिवस उलटून सुद्धा जन माहिती अधिकारी पहूर योगेश इंगोले यांनी माहिती न दिल्याने प्रवीण तायडे यांनी त्यांच्याशी भ्र.क्र.द्वारे संपर्क साधला असता माहिती देण्यास उप कार्यकारी अभियंता पहूर यांच्या द्वारे टाळाटाळ होत असल्याचे प्रवीण तायडे यांचे म्हणणे आहे. 

पहूर पोलीस ठाण्यासमोरील उच्चदाब वाहिनीच्या ठिकाणी उच्चदाब वाहिनीला जुन्याच विद्युत तारा असल्याचे त्यांनी सांगितले,मात्र रस्ता रुंदीकरणासाठी नियमाने विद्युत वाहिनी स्थलांतर खर्च भरून घेतला जातो मात्र शेंदुर्णी,पहूर या ठिकाणी जुन्याच विद्युत तारा कितीतरी ठिकाणी जॉईंट करून त्याच तारा वापरण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार लोक वस्तीच्या ठिकाणी होत असल्याने नागरिकांच्या जीवाची किती काळजी या ठेकेदारांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना आहे हे यावरून समजते.पहूर पोलीस ठाणे समोरील उच्चदाब विद्युत वाहिनीचे बेकायदेशीर स्थलांतराचे काम पहूर कक्ष अभियंत्यांनी कसे काय करून घेतले व उप कार्यकारी अभियंता योगेश इंगोले यांनी सबंधित माहिती देण्यास का टाळाटाळ केली.या सर्व प्रकारावर अपिलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता भुसावळ हे सबंधितावर काय कार्यवाही करतील हे बघणे तितकेक महत्वाचे ठरणार आहे असेही माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार प्रवीण तायडे यांनी  वृत्त पत्राशी बोलतानी सांगितले.

No comments