अंतुर्ली येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी किरण पाटील: मुक्ताईनगर प्रतिनिधी (संपादक: हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर ...
अंतुर्ली येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
किरण पाटील: मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अंतुर्ली येथे छत्रपती संभाजी महाराज चौकात असणाऱ्या स्तंभाजवळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दिनेश पाटील व सुनील पाटील यांच्या हस्ते औक्षण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी उपस्थित असलेल्या शंभू प्रेमींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ फुले वाहून पूजा केली यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करून फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली .याप्रसंगी अंतुर्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते




No comments