चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेचे वतीने श्रामणेर शिबीराला सुरुवात भारतीय बौद्ध महासभा शाखा चोपडा यांच्या वतीने दि.१४/५/२०२४ ते दि.२३/५/२०२४...
चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेचे वतीने श्रामणेर शिबीराला सुरुवात
भारतीय बौद्ध महासभा शाखा चोपडा यांच्या वतीने दि.१४/५/२०२४ ते दि.२३/५/२०२४ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन (समाज मंदिर)गौतम नगर स्टेट बॅक ऑफ इंडिया चोपडा समोर आयोजित करण्यात आले आहे.
प्रतिनिधी चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा चोपडा यांच्या वतीने दि.१४/५/२०२४ ते दि.२३/५/२०२४ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन (समाज मंदिर)गौतम नगर स्टेट बॅक ऑफ इंडिया चोपडा समोर आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी श्रामणेर शिबीराचे उदघाटन भन्ते आनंदथेरो तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वानखेडे,हितेंद्र मोरे,अशोक बाविस्कर,यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे,शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ, सुदाम ईशी, जानकीराम सपकाळे,छोटू वारडे, मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
या श्रामणेर शिबीरास २५ श्रामणेर बसले आहेत. श्रामणेर शिबीर उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हितेंद्र बिरबल मोरे जेष्ठ मार्गदर्शक यांनी केले.या शिबीरात दि.१४/५/२०२४ ते दि.२३/५/२०२४ पर्यंत रोज सकाळी ५ ते ६ आनापानसती आणि वंदना,सुत्र पठण होईल .


No comments