adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रशांत डिक्कर यांचा खळबळजनक आरोप.

  अतिवृष्टीने नुकसान झाले शेतकऱ्यांचे, भरपाई मात्र मर्जीतील कार्यकर्त्यांच्या खात्यात.. प्रशांत डिक्कर यांचा खळबळजनक आरोप. अमोल बावस्कार : म...

 अतिवृष्टीने नुकसान झाले शेतकऱ्यांचे, भरपाई मात्र मर्जीतील कार्यकर्त्यांच्या खात्यात..



प्रशांत डिक्कर यांचा खळबळजनक आरोप.

अमोल बावस्कार : मलकापूर प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

संग्रामपूर/ अतिवृष्टी, चक्रीवादळ, ढगफुटी, अशा नैसर्गिक संकटाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची नुकसान भरपाई न देता,अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने लोकप्रतिनिधीच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या बँक खात्यावर लाखो रुपये जमा केल्याचे अनेक किस्से जळगाव तहसिलमधे झाले असल्याचा आरोप स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केला आहे. जळगाव, संग्रामपूर तालुक्यात २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. कित्येक जनावरे पुराच्या पाण्याने वाहून गेले. हजारो नागरिक बेघर झाले. अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. पंरतु सत्ताधारी पुढाऱ्यांनी स्वताच्या स्वार्थासाठी अधिकाऱ्यांसोबत संगणमत करुन खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बदल्यात मर्जीतील कार्यकर्त्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई वितरीत केली. आणि ज्यांचे नावे जमिनच नाही अशा महाशयांच्या बँक खात्यावर खरडुनचे पैसे गेले हे गंभीर बाब आहे. आणि खरे शेतकरी मात्र मदतीपासून वंचित ठेवले हि वस्तुस्थिती आहे. हजारो शेतकरी अजुनही मदतीच्या अपेक्षेने शासकिय कार्यालयात चकरा घालुन घायाळ होत आहेत. आत्महत्येच्या पायरिवर उभे असलेल्या शेतकऱ्यांना प्रशासन मात्र उडवा उडवीचे उत्तर देऊन वेळकाढुपणा करित आहेत.  स्थानिक आमदार हे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अधिकाऱ्यांना पंचनाम्याच्या सुचना देऊन मोकळे होतात. पण आपली जबाबदारी म्हणून कधितरी  मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे धाडस आमदार संजय कुटे यांनी दाखवले नाही. एकवेळ शेतकऱ्यांना भरपाई रक्कम नाही मिळाली तरी चालेल. पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कार्यकर्त्यांनी हडपलेल्या पैशाला कात्री लागता कामा नये. शेतकरी मेला तरी चालेल परंतु कार्यकर्ता जगला पाहिजे अशा सुडबुध्दीने आमदारांचे वागणे बरे नव्हे. या अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळोवेळी रस्त्यावर आली. त्या त्या वेळी सत्तेच्या जोरावर पोलिसांवर दबाव आणून आंदोलनं दडपले शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना जेलमधे टाकले हि गोष्ट आता लपवून राहली नाही. २२ जुलै २०२३ च्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व २६ मे २०२४ रोजी च्या चक्रीवादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवुन देण्यासाठी व भ्रष्टाचार करणारे अधिकारी,सत्ताधांऱ्याना जेलमधे टाकण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिला आहे.

---------------------------------------

जळगाव तालुक्यात २६ मे रोजी चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे भरुन न निघनारे नुकसान झाले आहे. त्यामधे घरांचे नुकसान हे जास्त प्रमाणात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून केवळ दलाली न करता रितसर पंचनामे करून  नुकसानीचा मोबदला थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी केली आहे.


No comments