adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सराईत दरोडाखोरांच्या टोळीला चोपडा शहर पोलीसांकडुन अटक

  सराईत दरोडाखोरांच्या टोळीला चोपडा शहर पोलीसांकडुन अटक चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनी भागातील कॉलनीत चोरी करणाऱ्या सराईत दरोडाखोरांच्या टोळी...

 सराईत दरोडाखोरांच्या टोळीला चोपडा शहर पोलीसांकडुन अटक


चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनी भागातील कॉलनीत चोरी करणाऱ्या सराईत दरोडाखोरांच्या टोळीला अटक

प्रतिनिधी : चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)

दिनांक २८/०५/२०२४ रोजी चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनी भागातील श्री नवल ओंकार पाटील यांचे राहते घरी रात्री ०२:०० वा.चे सुमारास ते व त्यांची पत्नी झोपले असतांना अनोळखी ५ पुरुष चोरट्यांनी त्यांचे घराचे कंपाऊंडचे कुलूप व दरवाज्याचे कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करुन कोयत्याचा धाक दाखवुन चापटांनी मारुन तुम्ही आवाज केला तर तुम्हाला मारुन टाकु अशी धमकी देवुन शिवीगाळ करुन फिर्यादीचे घरातील कपाटात ठेवलेले रोख ९,५००/-रुपये तसेच स्टेट बँकेचे पासबुक तसेच आधारकार्ड असे त्यांचे समक्ष जबरदस्तीने काढुन चोरी करुन त्यांचे कडील पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी क्रमांक ८५५८ हिचेने पळुन गेले होते, अश्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोस्टे गु.र.नं. २२०/२०२४ भा.दं. वि. कलम ३९५,३२३,२९४,५०६ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदरील बाबतीत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे तपास पथकास माहीती मिळाली असता. पोलीस निरक्षक श्री मधुकर साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना पोलीस निरीक्षक साळवे यांनी सोबत घेवून  तात्काळ परीसरात शोध घेतला असता चोपडा शहर ते धरणगाव रोडला पाटाचारीचे कडेला सदर गुन्हयातील वाहन ब्रिझा कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी क्रमांक MH ०६ BU ८५५८ हि मिळुन आली. पोलीसांची चाहुल लागल्याने सदर वाहनातील ५ आरोपी हे पळुन जात असतांना आरोपी क्रमांक १) कौसर मुसा खाटीक वय २७ वर्ष रा. राणीपुरा होळी चौक दोडांईचा ता. शिंदखेडा जि. धुळे २) देवेंद्र युवराज काकडे वय ३० वर रा. गोपालपुरा दोडांईचा ता. शिंदखेडा जि.धुळे यांना पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडुन त्यांचे साथीदार ३) सुलतान खालीक पिंजारी रा. इस्लामपुरा दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे (फरार) ४) राजा कुरेशी पुर्ण नाव माहीत नाही. रा गौफनगर दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे (फरार) व एक अनोळखी इसम असल्याचे निष्पन्न केले.  आरोपींचे कब्जात एक ब्रिझ कंपनीची वाहन क्रमांक MH ०६ BU ८५५८ मिळून आले असुन सदर वाहनात एक लोखंडी कटर व वेगवेगळया नंबर असलेल्या ३ नंबर प्लेट मिळुन आल्या आहेत. तसेच आरोपी क्रमांक १) कौसर मुसा खाटीक वय २७ वर्ष रा. राणीपुरा होळी चौक दोडांईचा ता.शिंदखेडा जि. धुळे याचे कडे गुन्हयात चोरी केलेली रोख रक्कम १५००/- रु, एक कोयता व मोबाईल व आरोपी क्रमांक २) देवेंद्र युवराज काकडे वर ३० वर्ष रा.गोपालपुरा दोडांईचा ता. शिंदखेडा जि. धुळे याचे कडे गुन्हयात चोरी केलेली रोख रक्कम २०००/- रु, एक कोयता व मोबाईल मिळुन आला. असा एकुण ७,२३,५००/-रुपये किमतीचा मुददेमाल आरोपींकडुन हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयात अटक केलेले आरोपी क्र १) कौसर मुसा खाटीक वय २७ वर्ष रा. राणीपुरा होळी चौक दोडांईचा ता.शिंदखेडा जि.धुळे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस स्टेशन दोडांईचा

अ.क्र.

गु.र.नं व कलम १४२/२०१९ भा.दं.वि. कलम ३५३,३३२,५०४,५०६,३४ प्रमाणे

१४/२०२१ भा.दं. वि. कलम १४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,३३७,४२७ प्रमाणे

४७/२०२१ भा.दं.वि.कलम ३५४ (अ) (ड), ५०४, ५०६ पोक्सो कलम ११,१२,१८ प्रमाणे

४८/२०२१ भा.दं.वि.कलम ३०७,३५३,३३२,२२५,१४३,१४५,१४७,१४९,२६९,२७०,

२७१,५०४ सह म.पो.का. कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे

३४/२०२२ भा.दं.वि. कलम १४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४ सह म.पो.का. कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे

१८४/२०२२ भा.दं.वि. कलम ४५७,३८० प्रमाणे

१६८/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७,५०४,५०६ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे

२७/२०२४ भा.दं.वि. कलम १४३,१४७,१४८,२९५ सह अॅट्रॉसिटी कायदा प्रमाणे 

५५/२०२२ भा.दं.वि.कलम १४३.१४७,१४९ प्रमाणे

आरोपी क्रमांक ०२ देवेंद्र युवराज काकडे याचेवर खालील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

पोलीस स्टेशन दोडांईचा

अ.क्र.

गु.र.नं व कलम

२९/२०१८ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे

आरोपी क्र १) कौसर मुसा खाटीक वय २७ वर्ष रा. राणीपुरा होळी चौक दोडांईचा ता. शिंदखेडा जि. धुळे २) देवेंद्र युवराज काकडे वय ३० वर्ष रा. गोपालपुरा दोडांईचा ता. शिंदखेडा जि. धुळे यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. डॉ. महेश्वर रेडडी, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परीमंडळ, मा. श्री नंदवाळकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी अंमळनेर भाग अंमळनेर चार्ज चोपडा भाग चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे, सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत कंडारे, पोउपनि जितेंद्र वल्टे, सहा. पो. फौजदार जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ संतोष पारधी, शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, जितेंद्र चव्हाण, पोलिस नाईक-प्रशांत वाडीले पोलीस कॉन्टेबल- सुमेर वाघेरे, रविंद्र बोरसे, प्रकाश मथुरे महेद्र साळुंखे, हेमंत कोळी, प्रमोद पवार, समा तडवी  यांनी  केली आहे.



No comments