adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी भोवली

दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी भोवली  घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने तक्रारदार कडून दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी   अँन्टी...

दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी भोवली 


घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने तक्रारदार कडून दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी  

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. यांची सापळा रचून कारवाई  

प्रतिनिधी: चोपडा

(संपादक: हेमकांत गायकवाड)

सासऱ्याचे नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूल मंजुर झाले असल्याने घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने  याप्रकरणातील संबंधित तक्रारदार यांनी रविंद्र काशिनाथ पाटील , वय ५० वर्ष व्यवसाय नोकरी , तलाठी सजा विटनेर ता. चोपडा जि.जळगांव , वर्ग ३ यांची भेट घेऊन घरकुलांचे बांधकाम साठी रेती आवश्यक असल्याने चर्चा केली होती यासाठी रविंद्र पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- हजार रूपयांची मागणी केली होती तर दि.२८/५/२०२४ रोजी ५०००/- हजार रूपयांची लाच स्वीकारताना मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.यांच्या मार्गदर्शनाखाली रंगेहाथ पकडण्यात आले

 याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित तक्रारदार हेविटनेर ता. चोपडा जि.जळगांव येथिल रहिवासी असून तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूल मंजुर झालेले होते. घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने रविंद्र पाटील यांनी तक्रारदार यांचे कडेस वाळू ट्रक्टरचे वाहतूकीसाठी १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.२७/०५/२०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष दि.२८/०५/२०२४ रोजी पडताळणी केली असता (आलोसे) रविंद्र पाटील यांनी पंचा समक्ष ५०००/ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानंतर आलोसे यांना ५०००/ हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. याकामी  मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा. जिल्हाधिकारी सो.जळगांव सापळा पर्यवेक्षक अधिकारी श्री.सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. सापळा व तपास अधिकारी अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. जळगांव. सापळा पथक पो.ना. बाळू मराठे, पो कॉ प्रणेश ठाकूर कारवाई मदत पथक-पोनि एन.एन. जाधव ,सफौ दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर ,पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे ,पोकॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे या पथकाने कारवाई केली 

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.


अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव 


@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477


@ मोबा.क्रं. 8806643000


@ टोल फ्रि क्रं. 1064


==================


==================

No comments