adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इयत्ता १० वीचा निकाल उद्या सोमवारी २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर

  इयत्ता १० वीचा निकाल उद्या सोमवारी २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार  यंदा इयत्ता १० वी च्या परिक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्य...

 इयत्ता १० वीचा निकाल उद्या सोमवारी २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार 


यंदा इयत्ता १० वी च्या परिक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी

मुंबई :वृत्तसंस्था

(संपादक: हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून इयत्ता १० वीचा निकाल उद्या सोमवारी २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीचा निकाल २७ मे रोजी जाहीर केल्याची घोषणा राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे केली. यंदा इयत्ता १० वी च्या परिक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विद्यार्थी खालील दिलेल्या संकेत स्थळांवर निकाल पाहू शकतील. यासाठी विद्यार्थ्यांना या संकेत स्थळांवर जाऊन परीक्षा बैठक क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करून निकाल पाहता येईल.

http://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in


निकाल लागल्यानंतर मंगळवार २८ मे रोजी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्याची मुदत मंगळवार ११ जून पर्यंत असेल. यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे.

No comments