लोकसभेची मतमोजणी जवळ आल्याने धडधड वाढली लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया आता अवघ्या काही तासांवर आली आहे. येत्या मंगळवारी (४ मे) सकाळ...
लोकसभेची मतमोजणी जवळ आल्याने धडधड वाढली
लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया आता अवघ्या काही तासांवर आली आहे. येत्या मंगळवारी (४ मे) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार
रावेर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया आता अवघ्या काही तासांवर आली आहे. येत्या मंगळवारी (४ मे) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. जसजशी ही वेळ जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली आहे. सध्या चौकाचौकात पारावर एकच सवाल विचारला जात आहे, तो म्हणजे कोण होणार खासदार..? रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान झाले होते. मतदानानंतर गावोगावी रक्षाताई खडसे व श्रीराम पाटील यांच्या कार्यकत्यांनी आपल्या नेत्यांना आपापल्या भागातून किती मतदान होईल व तेही कसे होईल, याबाबत बिनधास्त छातीठोकपणे आकडेवारी सांगितली होती. नेत्याची मर्जी कायम राखण्यासाठी आपल्या भागात चांगले मतदान करून घेतल्याचे सांगितले जात होते. याबाबतच्या अंतिम फैसल्याची वेळ आता जवळ आली आहे. येत्या ४ तारखेला देशभरातून कोणाला किती जागा मिळणार व कोण किती मताधिक्यांनी विजयी होणार, हे स्पष्ट होणार आहे.
अंदाजात कोणी किती खोटे आकडे दिलेले असले, तरी तेही आकडे या निकालाने उघडे पडणार आहे. आता लवकरच कार्यकत्यांनी नेत्यांच्या मर्जीसाठी सांगितलेल्या आकडेमोडींचे पितळ उघडे पडण्याचे दिवस जवळ आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने अंदाजाचे पितळ उघडे पडणार आहे. मंगळवारी मतमोजणी पार पडताच मतदान केंद्रनिहाय पडलेल्या मतांची आकडेवारी समोर येणार आहे. पूर्वीसारखे मतपत्रिकेवरील मतमोजणी नसल्यामुळे मतमोजणी लवकरच पार पाडून निकालही लवकरच हातात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक केंद्रनिहाय जबाबदारी स्वीकारलेले गावपुढाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी त्यातून निर्माण झालेली शरदचंद्र पवार व उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष त्यातून त्यांच्या बाबतची सहानुभूती, मुस्लिम समाजाकडून झालेले मोठे मतदान या सर्व गोष्टींचा विचार करता मतदारातील मोठी जागृती दिसून येते. यामुळे नेते नसतील, तर मतदार असतील, याचा फायदा कोणाला होईल हे मात्र निकाला पुर्वी सांगणे कठीण आहे सर्वच नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पायाला भिंगरी लावून पिंजून काढला, व सोशल मीडिया आधुनिक यंत्रणेद्वारे व मोठमोठ्या नेत्यांमार्फत प्रत्येक गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी ही झाला. आता निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments