राज्यात चोपडा आगाराचा उत्कृष्ट कामगिरीचा दबदबा कायम प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील विविध श्रेणींच्या कामगिरीचे मु...
राज्यात चोपडा आगाराचा उत्कृष्ट कामगिरीचा दबदबा कायम
प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील विविध श्रेणींच्या कामगिरीचे मुल्यांकन करून त्यांना रॅंकीग दिले जाते
सर्वाधिक उत्पन्नात चोपडा आगार राज्यात प्रथम क्रमांकांवर
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:-चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील विविध श्रेणींच्या कामगिरीचे मुल्यांकन करून त्यांना रॅंकीग दिले जाते.दरम्यान एप्रिल २०२४ या महीन्यामध्ये प्रवाश्यांना चांगल्या सुविधा, सुरक्षित प्रवास, उन्हाळी सुटी व लग्नसराईत अतोनात मेहनतीच्या जोरावर राज्यात 'अ' वर्गात १००पैकी ९२ गुण मिळवुन चोपडा आगाराने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. चोपडा आगाराने उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य टिकुन चांगले उत्पन्न मिळवुन राज्यात अव्वल स्थान मिळविल्याने विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी आगार प्रमुख महेंद्र पाटील सह प्रशासन व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले.स्वचछ व सुंदर बसस्थानक म्हणुन नावलौकिक असलेले
चोपडा आगारा तर्फे उन्हाळी सुट्या व लग्नसराई लक्षात घेता पुणे,नाशिक, संभाजीनगर, सुरत सह जळगाव,धुळे जादा वाहतुक करून प्रवाशांना सुरक्षित व सुखकर सेवा देवुन विविध सुख सोयी उपलब्ध करुन देवुन विद्यार्थी ,महीला, जेष्ठ नागरिक सह विविध घटकांतील प्रवाशी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असतात.चोपडा आगारात एकुण ७६ वाहने असुन जवळपास दररोज २९००० हजार कि मी केले जातात.चालक१५७,वाहक १४६, प्रशासन ३८, कार्यशाळा कर्मचारी ५२ असे एकुण ३९५ कर्मचारी कार्यरत आहेत.
विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ सुंदर बसस्थानक, प्रवाशांना दिले जाणार्या सुख सुविधा व उत्पन्न वाढी साठी केलेले नियोजनामुळे व चालक/ वाहक /यांत्रिक/ प्रशासकीय व पर्यवेक्षकीय सहकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे व कामामुळे राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला यांचे सर्व श्रेय चोपडा आगारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना जाते असे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले


No comments