आसलगाव येथे दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद हाय...
आसलगाव येथे दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.
स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद हायस्कूल च्या वतिने सरपंच विष्णू इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मलकापूर :-जळगाव/ तालुक्यातील आसलगाव येथे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अंगी अधिक आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद हायस्कूल च्या वतिने सरपंच विष्णू इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार सोहळा पार पडला. दि. ५ जुन रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रामटेके सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
शैक्षणिक जिवनात जास्त महत्त्व अभ्यासासाठी द्या, ज्ञानप्राप्तीसाठी मार्गदर्शन मागवा, यशस्वी होण्यासाठी कमी पडु नका तसेच प्रशांत डिक्कर यांनी विद्यार्थ्यांसाठी अंमलात आणलेली संकल्पना कौतुकास्पद असल्याचे मुख्याध्यापक रामटेके सर यांनी बोलतांना सांगितले. सरपंच विष्णू इंगळे यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. यावेळी राठोड सर,डोंगरे सर, अढाव सर,भोपळे सर, जैन मॅडम, वानखेडे सर, गोळे मॅडम, दाते सर, पवार सर यांचेसह सामाजिक कार्यकर्ते भगवान टापरे,पत्रकार राहुल निर्मल, विठ्ठल राऊत गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.



No comments