कजगावचे वयोवृद्ध शेतकऱ्याचे बाबा ग्रुप संस्थापक नंदू पाटील यांना निवेदन भडगाव तालुक्यातील कजगाव येथील वयोवृद्ध शेतकरी एकनाथ पाटील यांनी बा...
कजगावचे वयोवृद्ध शेतकऱ्याचे बाबा ग्रुप संस्थापक नंदू पाटील यांना निवेदन
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील वयोवृद्ध शेतकरी एकनाथ पाटील यांनी बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष नंदु (बाबा) पाटील यांना निवेदन देत मदत करण्याची मागणी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो जळगाव :-
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथील वयोवृद्ध शेतकरी एकनाथ पाटील यांनी बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष नंदु (बाबा) पाटील यांना निवेदन देत मदत करण्याची मागणी केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात (अर्ज) असे म्हटले आहे की,माझी वडिलोपार्जित शेत जमीन ही हरेश धाडीवाल ही व्यक्ती गुंड आणि बळाचा वापर करून जमीनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहे.तसेच त्यांने ही जमीन मी ज्या व्यक्तीस मला पैश्याची गरज असतांना खरेदीखत करून दिले होते.व्याजासकट पैसे परत दिल्यावर खरेदीखत माझ्या नावे करून द्यावी, तुळशीदास चौधरी, हर्षल महाले,रा.चाळीसगांव यांना जमीन परत देण्याचा बोलीवर खरेदी करुन दिली होती,तरी मी त्यांना दोन वर्षांनंतर व्याजासह पुर्ण पैसे परत केले त्यावेळी त्यांनी मला दोन खरेदीखत करून दिलेल्या जमीनीपैकी एक शेत जमीन माझ्या मुलीच्या नावे पलट करुन दिली,दुसरी जमीन काही दिवसांत देतो असे सांगितले, या सुमारास दोन्ही शेतजमीनीवर माझ्या स्वतः ताबा व मी कसत आहे मशागत करत होतो, आजपर्यंत मी वारंवार तुळशीदास चौधरी, हर्षल महाले,यांना माझे शेत माझ्या नावे खरेदी पलटी करुन देण्यासाठी प्रयत्न करत होतो ते वारंवार टाळाटाळ करीत राहिले मागील वर्षापासून जेव्हा मी रीतसर पिकांपेक्षा लावण्यासाठी कजगाव येथील तलाठी यांच्याकडे अर्ज केला असता त्यांनी तो माझ्या नावे करून दिला तेव्हा पासून धाडीवाल रा.कजगाव हे मला ती जमीन माझ्या नावे आहे असे धमकावुन मला शेतजमीन पेलण्यास मशागत करण्यास अडथळा आणत आहे.माझा आणि हरेश धाडीवाल यांच्यात कोणताही व्यवहार झालेला नाही,तरी ते माझ्यावर दमदाटी करण्याचा नियमीत प्रयत्न करतात माझ्या वयोमानानुसार मला भांडण करणे शक्य होत नाही.या संदर्भात मी भडगाव पोलीस स्टेशन, तहसीलदार, पाचोरा प्रांताधिकारी, यांच्या कडे रीतसर न्याय मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी अपेक्षीत असे सहकार्य केले नाही, सहा.उप निबंधक जळगाव येथे ही सावकारी प्रकरणात अर्ज दाखल केला आहे.परंतु अद्याप कोणतीही कायदेशीर मदत केली नाही,माझे वय ८१ वर्ष असल्यामुळे या लोकांशी लढू शकत नाही,तरी आपली सामाजिक न्याय देण्याची भुमिका असते असे फेसबुक इतर सोशल माध्यमावर मी बघीतले आहे मला आपल्या कडून न्याय मिळावी या आशयाचे निवेदन बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष नंदु (बाबा) पाटील यांनी देण्यात आले होते. आज दिनांक ६ जुन रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नंदु पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह जमीनीवर फेरफटका मारला व कश्या पद्धतीने ती जमीन शेतकरी एकनाथ पाटील यांनी मिळेल त्या बाबतीत हितगुज केली

No comments