adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतली  केंद्रीय मंत्रिपदाची शपथ  रक्षाताई खडसे या २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत. तर कोथळी गावच्या सर...

रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतली  केंद्रीय मंत्रिपदाची शपथ 

रक्षाताई खडसे या २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत. तर कोथळी गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य,२०१४ मध्ये रावेर मतदारसंघातून खासदार, असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला.

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- नवी दिल्ली वृत्तसंस्था

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

आज रविवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही खासदारांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली. यात सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडली आहे. 


जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. संगणकशास्त्रातील पदवीधर आणि मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या रक्षाताई खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. रावेर मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपने रक्षाताई खडसे यांना सलग तिसऱ्यांदा संधी मिळाली होती. त्यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. रक्षाताई खडसे या २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत. तर कोथळी गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य,२०१४ मध्ये रावेर मतदारसंघातून खासदार, असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने पुन्हा रक्षाताई यांच्यावर आणि मतदारांनी रक्षाताई यांच्यावर विश्वास ठेवला.

काय म्हणाल्या रक्षाताई खडसे ?

रक्षाताई खडसे म्हणाल्या की, माझी राजकारणाची सुरुवातच एकनाथ खडसे यांच्यापासून झाली आहे. माझ्या राजकीय प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. माझ्या माहेरच्या लोकांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. सामाजिक कामाची आवड मला माझ्या वडिलांपासून मिळालेली आहे. एका राजकीय घराण्यात मी सून म्हणून आले. नाथाभाऊ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आयुष्यातील बरीच परिस्थिती बदलत गेली. त्या परिस्थितीत नाथाभाऊंनी मला खूप साथ दिली असून  पक्षाच्या नेत्यांसह सर्व जनतेने मला साथ दिली आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. इतकी मोठी संधी मला मिळत आहे, असे म्हणताना रक्षाताई खडसे भावूक झाल्याचे दिसून आले. मला कुठलीही अपेक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकाविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये रावेरच्या रक्षाताई खडसे यांना मंत्रिपदी संधी मिळाली आहे. कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे रक्षाताई या भाजप सोबत एकनिष्ठ राहिल्या  त्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे.

No comments