adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विवरा आरोग्य उपकेंद्र व समता फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

  विवरा आरोग्य उपकेंद्र व समता फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न जागतिक नेत्रदान दिनी १२५ लाभार्थ्यांची तपासणी तर ६८...

 विवरा आरोग्य उपकेंद्र व समता फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न


जागतिक नेत्रदान दिनी १२५ लाभार्थ्यांची तपासणी तर ६८रुग्णांची  होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- प्रतिनिधी मोठा वाघोदा ता. रावेर 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त रावेर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र विवरे खुर्द आणि  समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दि.१० जून सोमवार रोजी आयोजित करण्यात आली होती.या शिबिरात रुग्णांची निशुल्क तपासणी करण्यात आली.मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची निशुल्क शस्त्रक्रिया ,राहण्याची, येण्या जाण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय विवरे खुर्द येथे करण्यात आले.जवळपास १२५ लोकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला त्यापैकी ६८ मोतीबिंदूचे पेशंट आढळले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच सौ स्वरा पाटील  ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील,कांताई नेत्रालय जळगाव तर्फे डाॅ ज़की शेख, गजानन खेवलकर, प्रशांत वराडे. 

समता फाऊंडेशन चे चेतन दुसे.आरोग्य उपकेंद्र विवरे खुर्द चे आरोग्य सेवक शुभम महाजन, समुदाय वैद्यकीय अधिकारी गणेश कचरे,आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी प्रल्हाद लोखंडे, दिनेश पाटील, कुंदन पाटील यांनी परिश्रम घेतले

No comments