adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेतली शपथ

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेतली शपथ   सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपध घेणारे मोदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्...

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेतली शपथ  


सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपध घेणारे मोदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असणार आहेत. तसंच लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरूंनंतरचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- नवी दिल्ली वृत्तसंस्था

(संपादक : हेमकांत गायकवाड)

 देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी विविध देशांचे पंतप्रधान, आणि दिग्गज हे या सोहळ्याला उपस्थित आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपध घेणारे मोदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असणार आहेत. तसंच लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरूंनंतरचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. तर पंतप्रधानपदावर सर्वाधिक कार्यकाळाच्या बाबतीत मोदी तिसऱ्या नंबरवर आले आहेत.


 राष्ट्रपती भवनामध्ये या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी तसंच देशभरातले दिग्गजही उपस्थित आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये या पाहुण्यांसाठी जवळपास ८ हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून एकूण ६ जण शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपकडून नितीन गडकरी, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, पियुष गोयल यांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि आरपीआयकडून रामदास आठवले मंत्रिपदाची शपथ घेतील.४ जूनला देशाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, यात भाजपला २४० जागांवर विजय मिळाला, पण २७२ जागांचा बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही, पण भाजप प्रणित एनडीएला २९२ जागांपर्यंत मजल मारली. बहुमत मिळाल्यानंतर एनडीएच्या बैठकीत सर्व घटकपक्षांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंब्याचं पत्र दिलं. एनडीएच्या पाठिंब्याचं हे पत्र राष्ट्रपतींना देण्यात आलं, त्यानंतर राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ घेण्यासाठी बोलावलं.

No comments