adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरी परत येत असतांना अज्ञातांकडून प्राध्यापकावर गोळीबार

घरी परत येत  असतांना अज्ञातांकडून प्राध्यापकावर गोळीबार  अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गाने दुचाकीवरून शिरपूर येथे परत येत असताना तऱ्हाडी गा...

घरी परत येत  असतांना अज्ञातांकडून प्राध्यापकावर गोळीबार 

अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गाने दुचाकीवरून शिरपूर येथे परत येत असताना तऱ्हाडी गावाजवळ मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी केला गोळीबार, गोळीबाराच्या घटनेनं खळबळ


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:शिरपूर

(संपादक:हेमकांत गायकवाड)

धुळे : अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी गावाजवळ  दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी प्राध्यापकावर गोळीबार केल्याची घटना ९ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत प्राध्यापकाच्या कमरेजवळ गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शिरपूर शहरातील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.


दिनेश रमेश पटेल असे जखमी झालेल्या प्राध्यापकांचे नाव आहे. ते शहरातील एसपीडीएम महाविद्यायात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश रमेश पटेल ९ जून रोजी दुचाकीने शाहदा तालुक्यातील ब्रम्हपुरी जवळ असलेल्या सुलवाडे येथे बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गाने दुचाकीवरून शिरपूर येथे परत येत असताना तऱ्हाडी गावाजवळ  मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर ते दोघे घटनास्थळावरुन पसार झाले. संशयितांनी दोन फायर केल्याचे सांगितले जात आहे. त्यात एक गोळी कमरेजवळ लागल्याने दिनेश रमेश पटेल जखमी झाले. त्या अवस्थेत तऱ्हाडीपर्यंत दुचाकी नेत ग्रामस्थांना घडलेली हकीकत सांगितली.   ग्रामस्थांनी त्यांना शिरपूर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर डीवाएसपी भागवत सोनवणे, शाहदा डीवाएसपी दत्ता पवार, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी, सारंगखेडा, शाहदा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. हे कृत्य कोणत्या कारणांतून घडले हे अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.



No comments