एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुससह आरोपी जेलबंद , चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई नेशन महाराष्ट्र ब्युरो : चोपडा प्रतिनिधी (संपा...
एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुससह आरोपी जेलबंद , चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई
नेशन महाराष्ट्र ब्युरो : चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील मोरचिडा गावचे हद्दीत उमर्टी, अंमलवाडी ते मोरचिडा जाणारे रोड वरुन एक जण ०१ गावठी अग्नीशस्र कट्टा (पिस्टल) आणि ०२ जिवंत काडतुस हे प्राणघातक अग्नीशस्र नेत असल्याची माहिती गुप्त बातमीव्दारा मार्फत चोपडा ग्रामीण पो.स्टे पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर सो यांना बातमी मिळाली त्यानुसार त्यांनी दि. ०१/०६/२०२४ रोजी २०.४५ वा चे सुमारास मोरचिडा गावचे हद्दीत उमर्टी, अंमलवाडी ते मोरचिडा जाणारे रोडवर इसम नामे महेश बाळकृष्ण चव्हाण वय ३१ वर्षे मूळ रा. नगर मनमाड रोड, दत्तनगर मु/पो शिडी तालुका राहता जि. अहमदनगर हल्ली रा. प्लॉट नंबर ४, श्री केशववाडी अपार्टमेंट, जनार्दन नगर, जेलरोड, नाशिक हा त्याचे ताब्यातील ०१ गावठी अग्नीशस्र कट्टा (पिस्टल) आणि ०२ जिवंत काडतुस हे प्राणघातक अग्नीशस असल्याचे माहित असतांना, विनापरवाना बेकायदेशीर आपले कब्जात बाळगुन वाहतुक करुन घेवुन जात होता.त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात खालील वर्णानाचा मुद्देमाल मिळुन आला तो.१) २५,०००/- रु किंमतीचा एक गावठी बनावटी कट्टा (पिस्टल) लोखंडी (स्टील) धातुचा त्यास चॉकलेटी रंगाची मुठ असलेला मॅक्सझिन सह आरोपी याने परिधान केलेली नाईट पॅन्ट च्या पुढचे बाजुस असलेल्या खिशात मिळून आला तो.कि.अ. २) २०००/- रु किंमतीचे पिवळया धातुचे ०२ काडतुस (राऊंड) नाईट पॅन्ट च्या पुढचे बाजुस असलेल्या खिशात मिळुन आला ३) ५००/- रु रोख त्यात १०० रु दराच्या ०५ चलणी नोटा आरोपी याने परिधान केलेली नाईट पॅन्ट च्या मागच्या खिशात मिळुन आले. ४) ७०,००० /- रु किंमतीची टी.व्ही.एस जुपिटर कंपनीची राखाडी रंगाची तिचा आर टी ओ रजि नं एम एच १५जे एन ४०३५ असा असलेली जु वा.कि.अ ९७.५००/- रु एकुण येणे प्रमाणे वरील वर्णानाचा मुद्देमाल आरोपी नामे महेश बाळकुष्ण चव्हाण वय ३१ वर्षे मुळ रा.नगर मनमाड रोड, दत्तनगर मु/पो शिडी तालुका राहता जि. अहमदनगर हल्ली रा. प्लॉट नंबर ४, श्री केशववाडी अपार्टमेंट, जनार्दन नगर, जेलरोड, नाशिक याचे ताब्यात मिळुन आले मा.पोनि/कावेरी कमलाकर सो यांनी हजर पंचासमक्ष पंचनामा केला असुन सदर इसमा विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, मु.पो. अॅक्ट कलम ३७(१) (३) चे उलंघन १३५ प्रमाणे पोशि, रावसाहेब पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो जळगाव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो चाळीसगाव परिमंडळ व उपविभागीय पोलीस अधिकारी सो, चोपडा विभाग चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/कावेरी कमलाकर सो पोशि दिपक शिंद, पोशि रावसाहेब पाटील यांचे पथकाने केली असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास पोना शशिकांत पारधी हे करीत आहेत.


No comments