दोन हजार वर्षापूचीचे घट खंडागम प्राकृत ग्रंथाची प्राकृत दिनानिमित कुसुंबी येथे पालखी सोहळा सुमारे २००० वर्षाचा काळ गटला आहे. तो दिवस म्हण...
दोन हजार वर्षापूचीचे घट खंडागम प्राकृत ग्रंथाची प्राकृत दिनानिमित कुसुंबी येथे पालखी सोहळा
सुमारे २००० वर्षाचा काळ गटला आहे. तो दिवस म्हणजे "श्रुत पंचमी" दिवस म्हणतात
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
कुसुंबा येथे सकल जैन समाज बांधवाच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात श्रुतपंचमी अर्थात प्राकृत दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आल्याची माहिती कुसुंबा प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त आणि खान्देश जैन समाजाच प्रसीध्दी प्रमुख खान्देश जैन पत्रकार सतीष वसंतीलाल जैन व महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली. याविषयी विशेष वृत्त असे की जैन संप्रदायातील महान ग्रंथ धवला महाधवला षटखंडागम ग्रंथ हे याच दिवशी प.पु पुष्पदंत मुनीश्री व श्री प.पु भूतबली मुनीश्री यांच्या करवी हा ग्रंथ, प्राकृत भाषेत आजच्या दोन हजार वर्षापूर्वी गुजरात मधील अंकलेश्वर नगरात पुज्यमुनीश्रीनी शब्दबद्ध /लिपीबद्ध केले त्यास सुमारे २००० वर्षाचा काळ गटला आहे. तो दिवस म्हणजे "श्रुत पंचमी" दिवस म्हणतात तो ग्रंथ प्राकृत भाषेत असून त्या दिनापासून जैन बांधव प्राकृत दिवस साजरा करीत असतात व या दिवशी ग्रंथाची पूजा अर्चा करून पालखी काढतात संस्कृतीचा आधार असलेल्या शास्त्र ग्रंथांचे सरक्षण संवर्धन व्हावे, हा त्याचा खरा उद्देश आहे. कुसुंब्यातील प्राचीन जैन मंदिरात प्राचीन शास्त्र ग्रंथ एका मंचावर ठेवण्यात आले होते.
श्रावक श्रावीकांनी शास्त्रग्रंथाची भक्तीभावाने पुजा केली लहानापासून थोरापर्यतांनी यापुजेचा लाभ घेतला सकाळी अभिषक पुजन अनेक इंद्रांनी अभिषेक व शांतीधारा केली आणि विश्वशांतीसाठी व सुखसमृध्दीसाठी विश्वमंभा (शांतीमंत्र) द्वारे भगवनतांवर शांतीधारा करण्यात आली. पूजा अभिषेकानंतर पालखीचे आयो जन करण्यात आले पालखीत षटखंडागम ग्रंथ ठेउन नगरात व नगरातून मिरवणूक काढण्यात आली. त्या प्रसंगी जय जय कारांनी परिसर दुमदुमून निधाला ठिकविकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत करून घरोघरी प्राचीन ग्रंथाची अर्घ दिले हि मिरवणूक जवळ जवळ दिडते दोन तास चालली. याच दिवशी जुने शास्त्र साफ करून त्यांना वेष्टण घातले गेले या कार्यासाठी बहुसंख्य महिलांनी सहभाग नोंदविला होता. तसेच नवीन शास्त्रग्रंथ विकत घेतले नित्य नियमाने स्वाध्याय करण्याचा संकल्प केला जातो है शास्थ ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची तीर्थकरांची वाणी शब्दबद्ध असल्याची जैन बांधवांची श्रध्दा आहे.


No comments