सावद्यातील तो गुटखा माफिया कोण? त्याचे गुटखा विक्री कडे सावदा पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष का? कारवाई न करण्यामागे पोलीस प्रशासनाचे अर्थपूर...
सावद्यातील तो गुटखा माफिया कोण?
त्याचे गुटखा विक्री कडे सावदा पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष का? कारवाई न करण्यामागे पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध तर नाही ना?
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- सावदा प्रतिनिधी /मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जिल्हाभरात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू पान मसाला विमल गुटखा पकडून कारवायांचे सत्र सुरू आहे मात्र सावदा पोलीसांची एकही कारवाई निदर्शनास आलेली नाहीच सावदा पोलिस स्टेशन कडून या गुटखा विक्रीची व वाहतुकीची सुट देतेय कशासाठी? सावदा पोलिस स्थानक व महामार्गावरील मुख्य पोलीस चौकी च्या हाकेच्या अंतरावर मुख्य चौकात मध्यभागी असलेल्या पान मसाला होलसेल व्यापारी प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू पान मसाला व विमल गुटख्याची खुलेआम ट्रक द्वारे वाहतूक करुन सावदा शहरातील हा बहादुर गुटखा माफिया इतक्या निधळ्या हिमतीने निडरतेने गुटखा आणतोच कसा? तसेच मोटारसायकल सायकलवर शहरात विकतो याचाच अर्थ सावदा पोलिस प्रशासनाचा संबंधित गुटखा किंगावर वचक नसावा का?वचक नसल्यामुळेच तर गुटखा विक्री करीत असावा का? सावदा पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचे निदर्शनास हा प्रकार आला नसेल का?का सावदा पोलिस प्रशासन या गुटखा माफियाशी आर्थिक हितसंबंध जोपासत असावेत का? आर्थिक हितसंबंध नसतील तर संबंधितावर कारवाईसाठी दिरंगाई का? सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या या जीवघेणा सुगंधित तंबाखू पान मसाला विमल गुटखा विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत केलेला असुनही सावदा शहरातच मोठ्या हिमतीने निडरतेने हा सावद्यातील गुटखा माफिया अन्न औषध प्रशासन विभाग व पोलिस प्रशासना व कायदा पेक्षा वरचढ आहे का? का या सावदा येथील होलसेलर गुटखा माफिया वर कारवाई केली जात नाही? तात्काळ सावदा पोलिस प्रशासनाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे मुक्ताईनगर चे पोलीस उपविभागीय अधिकारी तथा उप अधीक्षक राजकुमार शिंदे यांचेसह अन्न औषध प्रशासन विभागाने तातडीने या गुटखा माफिया विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी व्यसनमुक्ती केंद्र संचालक व सुज्ञ शहर वासीयां कडून केली जात आहे

No comments