सरपंचपदाचा वाद... सात वर्षांपासून त्रास देणे सुरूच...! काल्पनिक चित्र मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने घुमावलच्या तिघांना अटक; ग्रामि...
सरपंचपदाचा वाद... सात वर्षांपासून त्रास देणे सुरूच...!

काल्पनिक चित्र
मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने घुमावलच्या तिघांना अटक; ग्रामिण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील घुमावल येथील महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील, पवन मगन पाटील यांच्या काकांच्या विरोधात वसंतराव प्रेमराज पाटील हे 2018 मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून हे निवडून आले होते त्यामुळे महेंद्र, मनोज आणि पवन ह्या तिघांना जिव्हारी लागले होते त्या वेळेपासून वसंतराव पाटील यांच्या पुतण्या मंगेश यास कोणत्या अन कोणत्या कारणावरून त्रास देणे सुरूच होते अनेक वेळा समजून देखील पुतण्याला त्रास देतच असल्याने या त्रासाला कंटाळून मंगेशने आपल्या राहत्या घराचा छतास लोखंडी गोल कडीला नॉयलॉन दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मंगेश ने चिठ्ठी लिहून ठेवली होती.तरी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने महेंद्र, मनोज आणि पवन ह्या तिघांच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वसंतराव प्रेमराज पाटील यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आले असून या तिघांना अटक करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील घुमावल येथील महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील, पवन मगन पाटील यांच्या काकांच्या विरोधात वसंतराव प्रेमराज पाटील हे 2018 मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हुणून फक्त 18 मतांनी निवडून आले होते आरोपी महेंद्र पाटील,मनोज,पाटील, पवन पाटील यांचे काका सदाशिव दंगल पाटील हे निवडणुकीत पराभूत झाल्याने तेव्हा पासुन ते आमचा राग, द्वेष करीत होते. त्यादरम्यान जुलै 2023 मध्ये महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील व पवन मगन पाटील या तिघांनी माझा पुतण्या मंगेश रेवानंद पाटील हा महेंद्र एकनाथ पाटील याच्या मुलीशी शाळेच्या बस स्टॉफवर बोलत असतांना महेंद्र एकनाथ पाटील यास वाईट वाटले व त्याने त्यांचा बोलण्याचा दुराग्रह करुन वेगळा संशय घेतला व सदर घटनेवरुन वरील तिघांनी माझा पुतण्या मंगेश यास लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली होती व त्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती परंतु मी सदर वेळी सरपंचपदी कार्यरत असल्याने उगाच राजकिय वैमनस्य वाढु नये व गावात सलोख्याचे व शांततेचे वातावरण रहावे म्हणुन सदर वाद हा पोलीस स्टेशनला न नेता तो गावातच सामंजस्याने मिटवुन टाकला होता. तेव्हापासुन ते मंगेश यास व माझे परिवारा पासुन कोणत्या न कोणत्या कारणाने त्यांचे त्रास देणे सुरु होते.दिनांक 11 रोजी सकाळी 09.30 वा चे सुमारास पुतण्या मंगेश पाटील हा कॉलेजचे ऍडमिशनसाठी घुमावल बु ते चोपडा रस्त्याने चोपड्याकडे जात असतांना विश्वास तुळशिराम पाटील यांचे शेताजवळ रोडवर महेंद्र एकनाथ पाटील याने पुर्वीप्रमाणेच केलेल्या घटनेची पुनरावृत्ती करुन त्याने मंगेश याच्या अंगावर त्याचे स्वताची मोटर सायकल अती वेगाने चालवित घेवुन गेला आणि मंगेश यास आई, बहीणीवरुन शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा मी माझ्या शेतात असतांना सदर प्रकार घडल्यानंतर पुतण्या मंगेश हा माझ्याकडे शेतात रडत आला आणि त्याने वरील घडलेला प्रकार मला सांगीतला व बोलला की, अहो पप्पा महेंद्र व मनोज यांना काहीतरी समज द्या ते मला कायम डिवचता व मारण्याचा प्रयत्न करतात त्यांचे त्रासाला मी कंटाळलेलो आहे त्यांना आपण समज न दिल्यास मी आत्महत्या करुन माझे जिवन संपवेल मी त्यांच्या मानसिक व शारिरिक त्रासाला कंटाळलो आहे असे सांगीतल्याने मी लगेच महेंद्र पाटील यास माझ्या फोनवरुन त्यास विचारणा केली असता त्याने मला व पुतण्या मंगेश यास फोनवरुन अभद्र अश्लिल शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व तु तिथेच थांब आम्ही येतोय तेथे, आल्यावर तुला पाहुण घेवु असे म्हणुन फोन कट करून काही वेळाने महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील व पवन मगन पाटील हे संगनमत करुन तिघे माझ्या शेतात आले अणि महेंद्र याने त्याचे हातातील लोखंडी रॉड घेवुन माझ्या अंगावर मला मारण्यासाठी उगारला व म्हणाला की, या लोखंडी रॉडनेच तुझे डोके फोडुन मेंदु बाहेर काढेल असे म्हणत धमकी दिली व मनोज तसेच पवन याने मला धक्काबुक्की करुन शिवीगाळ करुन ते तेथुन निघुन गेले. त्यानंतर मी सदर घटनेबाबत दिनांक 11 रोजी चोपडा ग्रामिण पो स्टे ला प्रत्यक्ष व पोस्टद्वारे तक्रारी अर्ज दिला होता त्यावरुन पोलीसांनी आम्हाला व गैरतक्रारदार यांना दिनांक 13 रोजी चोपडा ग्रामिण पो स्टे ला बोलाविले होते तेव्हा पोलीसांनी महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील व पवन मगन पाटील यांना नोटीस देवुन समज देवुन सोडण्यात आले होते.दि.15 रोजी सकाळी 11.30 वा चे सुमारास मी घरी असतांना पुतण्या मंगेश हा माझ्याकडे आला व त्याने मला सांगीतले की, महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील व पवन मगन पाटील हे मला पुन्हा रस्त्यात भेटले व मला पाहुण हातवारे करुन पोलीसांनी आमचे काय? वाकडे केले आम्हाला तर सोडुन दिले, असे बोलुन तुझ्या सर्व परिवाराला आम्ही जिवे संपवुन टाकु अशी धमकी दिली तेव्हा मी पुतण्या मंगेश याची समजुत घालुन त्यांचे नांदी लागु नको असे सांगुन मी त्यानंतर माझी बहीण चित्राबाई गणेश पाटील हीस तीचे घरी नकाणे, ता. जिल्हा धुळे येथे माझ्या कारने सोडण्यास गेलो त्यानंतर मी सायंकाळी 5.30 ते 6.00 वा घरी आलो तेव्हा पुतण्या मंगेश मानसिक तणावाखाली दिसला म्हणुन मी त्यास धिर देवुन त्याची समजुत काढली होती.रात्री जेवणानंतर अभ्यास करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला असता दि. 16 रोजी मी नेहमीप्रमाणे सकाळी 6.00 वा चे ते 6.30 वा चे सुमारास मंगेश उठला नसल्याने व तो खाली आला नसल्याने मी त्यास उठवण्यासाठी वरचे मजल्यावर गेलो असता तर त्याने नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. त्याच खोलीमध्ये असलेल्या ड्रेसिंग टेबलवर एका रजिस्टरच्या पानावर लाल शाईने इंग्रजी शब्दाने परंतु त्याचा मराठी अर्थबोध होत असलेल्या चिठ्ठीमध्ये मंगेश याने स्वःताचे हस्ताक्षरात मृत्युपुर्व लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये # PaPa Aaj Paryant Mi jitkya pan chukka kelya astil tyachya sati mi mafi magto Aajun tyach Barobar Sarvya chya mafi mgto Hath Jodun aai Bapu DaDa vagre Sarve Mi ha nirnay gyala nko hota pan mala ata raych nahi he असे म्हणुन त्या चिठ्ठीमध्ये mi ata pan tasch kart alo pan mhjya ne sahin nahi honar ya pude mala tyane marnya chi Dhamki Dili he Mi fashi lavun mela tari chale pan mala tyanchya hatun maryach nahi he अशा आशयाची चिठ्ठी लिहिलेली मिळुन आली.यावेळी मंगेश यास चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरानी मंगेशला मृत घोषित केले. या बाबत ग्रामिण पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आले आहे. सदर तिघे आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
No comments