विवाहीतेने केली जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे न्यायाची मागणी. दिनांक ९ / ७ / २०२४ रोजी परत विवाहीतेस लाकडी काठीने डोक्यात जबर मारहाण क...
विवाहीतेने केली जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे न्यायाची मागणी.
दिनांक ९ / ७ / २०२४ रोजी परत विवाहीतेस लाकडी काठीने डोक्यात जबर मारहाण करून केले गंभीर जखमी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-: वाशीम
(संपादक :-: हेमकांत गायकवाड)
दिनांक १२/ ०७ /२०२४
सविस्तर वृत्त असे की,कोयाळी जाधव येथील विवहित महिला हिला तिच्या नवऱ्याने जबर मारहाण केली .तिचा पती हा तिला शिल्लक कारणावरून मारहाण करीत असतो ,तिच्या चारित्र्यावर संशय करीत असतो , तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असतो.दिनांक ९ / ७ / २०२४ रोजी परत तिला लाकडी काठीने डोक्यात जबर मारहाण करून तिला गंभीर जखमी केले आणि तिला मारहाण करून आरोपी पती हा फरार झाला.
तरी शिरपूर पोलिस स्टेशन चे बिट जमदार राजेंद्र वानखेडे यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आरोपी पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला आहे असा आरोप विवाहित पत्नीने केला आहे. बिट जमदार राजेंद्र वानखेडे यांनी मला मी मागास प्रवर्गातील मातंग समाजाची असल्याने मला अपमानास्पद वागणूक दिली आणि माझी काहीही तक्रार न घेता घरी रवाना केले .असा आरोप विवाहित महिलेने केला आहे.तरी संबधित आरोपी पतिवर कलम ३५४ लावली असून पती सद्याही विवाहित पत्नीला जिवाने मारून टाकण्याच्या धमक्या फोन द्वारे देत आहे.या आरोपी पतीवर कडक कारवाही करावी , संबधित बिट जमदार राजेंद्र वानखेडे यांच्यावर अट्रोसिटी दाखल करावी, माझ्या आरोपी पतीवर ३२४ ची कलम दाखल व्हावी अशी मागणी विवाहित पत्नीने केली आहे.यावेळी विवाहित पत्नीचे आई ,वडील ,भाऊ तसेच ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर, ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे विदर्भ संपर्क प्रमुख संविधान भाऊ ढोले,AIBTS चे वाशीम जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ इंगोले,जिल्हा उपाध्यक्ष नितीन बांगर,विदर्भ अध्यक्ष रवी भाऊ ठोके , महाराष्ट्राचे सचिव दिलीप भाऊ गायकवाड यांची उपस्थिती होती.



No comments