adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केळी विमा धारक शेतकऱ्यांची चेष्टा थांबेना.... संदीप पाटील, शेतकरी संघटना

  केळी विमा धारक शे तकऱ्यांची चेष्टा थांबेना.... संदीप पाटील , शेतकरी संघटना  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा (संपादक :-  हेमकांत ग...

 केळी विमा धारक शेतकऱ्यांची चेष्टा थांबेना.... संदीप पाटील, शेतकरी संघटना 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा

(संपादक :-  हेमकांत गायकवाड)

दोन वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी असलेल्या १०९२७ शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या पॉलिस्या रद्द करण्यात आल्या होत्या २ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढल्यावर १६ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन ज्या शेतकऱ्यांनी केळी असल्याचे पुरावे सादर केले होते त्या ६६८६ शेतकऱ्यांच्या पिक पॉलिसी ना मंजूरी जिल्हाधिकारी यांनी मान्यता देऊन तत्काळ पिक विम्याची रक्कम द्यावी असा आदेश दिला होता. त्यानंतर पाच महिने उलटले तरी प्रशासन पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देत नाही हे लक्षात घेऊन १० जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी शेतकरी संघटना यांनी तीन दिवस ठिय्या आंदोलन केले तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी १८ जुलै पर्यंत शेतकरी प्रतिनिधी व संबंधितांची पिक विम्यावर बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असं लेखी स्वरूपात पत्र दिले आहे.  मात्र काल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा सोबत जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन मंजूर असलेल्या शेतकऱ्यांचे पिक विमा प्रस्ताव परत पडताळणीचे आदेश काढून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे.

पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर न करण्याची शासनाची मानसिकता.....


केळी पीक विमा नुकसान भरपाई प्रलंबित असलेले ६६८६ शेतकऱ्यांची शासन चेष्टा करत आहे. यापूर्वी पडताळणी झालेली असून आता परत कशाची पडताळणी करणार???


 केळी पिक विमा काढतेवेळी शेतकऱ्यांनी जिओ टॅग केलेले फोटो जोडलेले आहे.


 विमा मंजूर केल्यानंतर शेतकऱ्यांनी किडी लागवड केल्याचे पुरावे (७/१२ उतारा केळी पिक पेरा असलेला, जिओ टॅग केलेले फोटो, काही शेतकऱ्यांनी टिशूरोप खरेदी केल्याच्या पावत्या, केळी विक्रीच्या पावत्या, बँक खात्यात केळी विक्रीपासून जमा झालेले पैशाच्या पुरावे सादर केले आहेत. 


👉 या कागदपत्रांची पडताळणी तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी करून जिल्हास्तरीय समिती समोर ठेवून जिल्हास्तरीय समितीने देखील मान्यता दिली. 

 आता परत कशाची पडताळणी करणार???

केळी विमाधारक शेतकऱ्यांची थट्टा तात्काळ थांबवा. असं शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे

काय म्हणाले संदिप पाटील !

कालच्या पिक विम्याच्या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी मान्यता असलेल्या ६६८६ पिक विमा प्रस्तावांची परत पडताळणीचे आदेश काढून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत 

संदीप पाटील 

उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष 

शेतकरी संघटना

No comments