adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा रोटरी क्लब तर्फे वृक्ष लागवड

  चोपडा रोटरी क्लब तर्फे वृक्ष लागवड    'माझी वसुंधरा कार्यक्रम' अंतर्गत चोपडा नगरपरिषद चोपडा व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त...

 चोपडा रोटरी क्लब तर्फे वृक्ष लागवड 

  'माझी वसुंधरा कार्यक्रम' अंतर्गत चोपडा नगरपरिषद चोपडा व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-:  महेश शिरसाठ चोपडा

संपादक:-: हेमकांत गायकवाड 

पाणी हे जीवन असून पृथ्वीवरील सजीव सृष्टी जगविण्याचे काम पाण्याशिवाय अशक्य आहे. माणूस व प्राण्यांप्रमाणेच वृक्षांनाही पाण्याची आवश्यकता असते. पृथ्वीवर वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जातो. म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन त्यांचे संगोपन होणे गरजेचे आहे. यासाठी जगभर प्रायत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'माझी वसुंधरा कार्यक्रम' अंतर्गत चोपडा नगरपरिषद चोपडा व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील लासूर रस्त्यावरील समाजकार्य महाविद्यालयाच्या मागील शिवशाही कॉलनीत व स्वामी समर्थ मंदिर समर्थ नगरी परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.

          या कार्यक्रमाला प्रकल्प प्रमुख रोटे. नयन महाजन, चेतन टाटिया, व्ही. एस. पाटील यांच्यासह रोटे क्लबचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव बी. एस. पवार, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील (बा) व रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सदस्य उपस्थित होते. तसेच चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, उपमुख्याधिकारी संजय मिसर, बांधकाम अभियंता सचिन गवांदे, विद्युत अभियंता मंगेश जंगले, रोहित सुरुसे (संगणक अभियंता), निलेश ठाकूर (कर निरीक्षक), प्रवीण मराठे (अति. स्वच्छता  पर्यवेक्षक), विकास पाटील (आरोग्य निरीक्षक), अक्षय चौधरी (कर निरीक्षक), अभिषेक वाणी (शहर समन्वयक) व नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments