adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सप्ताह आयोजन

  चोपडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सप्ताह आयोजन श्री संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना, माळी समाज मंगल क...

 चोपडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सप्ताह आयोजन

श्री संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना, माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी होणार


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

         चोपडा येथे श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळा चे आयोजन करण्यात आलेले असून दिनांक ३०/७/२०२४  मंगळवार रोजी श्री संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना, माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे या पासून कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याचबरोबर दि ३०/७ ह भ प भानुदास महाराज भुसावलकर, दि ३१/७ ह भ प ज्ञानेश्वर महाराज पुनगावकर, दि १/८ ह भ प महेश महाराज चिखलीकर ह.मु.एकलग्न  दि २/८ ह भ प गजानन महाराज पारोळेकर, दि ३/८ सकाळी काल्याचे किर्तन ह भ प योगेश महाराज वाघाडीकर या सर्व महाराजांचे कीर्तन आपल्या सर्वांना लाभ मिळणार आहे त्याचबरोबर दैनंदिन पाच ते सहा काकड आरती होणार असून त्याचबरोबर संध्याकाळी हरिपाठ होणार आहे. तसेच शेवटच्या दिवशी  दि ३/८/२०२४ रोजी सात ते आठ हजार भाविक भक्तगण सर्व समाज बांधव साठी  महाप्रसादाचा आयोजन केले आहे त्याचबरोबर संध्याकाळी पालखी मिरवणूक शहरातून निघणार आहे, तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी श्रवणाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा अशी समस्त फुलमाळी समाज पंच मंडळ व समस्त फुल माळी समाज बांधव च्या वतीने असे आव्हान करण्यात येत आहे..

No comments