adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा आगारास विठुराया पावला

  चोपडा आगारास विठुराया पावला पंढरपुर यात्रे दरम्यान चोपडा आगारास ३४ लाखाचे विक्रमी उत्पन्न  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा (संपादक हे...

 चोपडा आगारास विठुराया पावला

पंढरपुर यात्रे दरम्यान चोपडा आगारास ३४ लाखाचे विक्रमी उत्पन्न 



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा

(संपादक हेमकांत गायकवाड)

 आषाढी पंढरपुर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन दिनांक १० जुलै ते २० जुलै दरम्यान भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या यात चोपडा आगाराला जवळपास ३४ लाखाचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.यात्रे दरम्यान आगारातुन ४८ वाहने ११२ फेर्या,५२८६२ किलोमीटर करून सवलतीसह ३३७८८२५ उत्पन्न मिळाले.सवलतीसह उत्पन्न प्रती कि मी ६३.९१ सवलतीसह भारमान १००% एकुण प्रवासी १०५१३ नी प्रवास केला यामुळे आगारास सवलतीसह १४,५६,००० नफा झाला अशी माहीती आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली. 


चोपडा आगारास विक्रमी उत्पन्न मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणारे चालक,वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचार्यांचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले व आभार मानले. व भविष्यात देखील असेच उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य  टिकवण्याचे आवाहन केले.

No comments