मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी परत एक आनंदाची बातमी उपलब्ध होणार नोकरीची सुवर्णसंधी नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुंबई (संपादक :- हेमकांत...
मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी परत एक आनंदाची बातमी उपलब्ध होणार नोकरीची सुवर्णसंधी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुंबई
(संपादक :- हेमकांत गायकवाड).
सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण सुरू असुन आता परत एक आनंदाची बातमी महिला वर्गासाठी आलीं आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. आदिती तटकरें यांनी अंगणवाडी मदतनीसांच्या भरतीची घोषणा केली असून ३१ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तरी इच्छुक महिलांनी अर्ज करावा, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' मध्ये महिलांना दरमहा १५०० रूपये बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. राज्य सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहेत. परंतु काही महिलांचे बँकेत खाते नसल्यामुळे त्यांना अडचण येते आहे. याच पार्श्वभूीवर ज्या महिलांची अजुनही बँक खाती नाही येत त्यांना बँकांचे खाते उघडून देण्यासाठी सहकार्य करावे. तसे आदेश बँकांना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेत.बँकेमध्ये फक्त तुमचे खाते असून चालणार नाहीतर त्यासाठी तुम्ही केवायसी करणही गरजेच आहे. त्यासोबतच खाते आधारकार्डसोबत जोडलेलं हवं. तरंच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.

No comments