चोपडा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी प्राआकेंन्द्राला दिली भेट नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संपादक:- ...
चोपडा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी प्राआकेंन्द्राला दिली भेट
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
कमळगाव शेतशिवारात गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर शेतात डॉ.निलेश किंगे यांच्या शेतात काम करत असलेल्या आदिवासी पावरा समाजाचे कुटुंब वास्तव्यास राहत होते, त्या कुटुंबातीलच ३ सदस्यांचा मृत्यू देखील झालेला आहे,
त्या शेतशिवरात राहत असलेल्या कुटुंबातील ३ लोकं अडावद आरोग्य केंद्रांत तर २ उपजिल्हा रुग्णालय चोपडा तर जळगांव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत,
त्यापैकी आज अडावद आरोग्य केंद्रातील प्रकृती स्थिर असल्याने ३ सदस्यांना घरी सुटी करण्यात आली आहे.
आज दिनांक-२१ जुलै २०२४ रविवार रोजी सकाळी प्राआकेंद्र-अडावद मधील उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या शेतशिवारातील पावरा कुटुंबाच्या सदस्यांच्या तब्बेतीची विचारपूस व चौकशी केली तथा सूचना देऊन मार्गदर्शन करतांना
चोपडा विधानसभा मतदार संघाचे
माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी प्राआकेंन्द्राला भेट दिली.
प्रसंगी..
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल गवांडे, गावांतील... पी.आर.माळी सर, सचिन महाजन, नंदू पाटील, लोकेश काबरा, जावेद खान, हरीश पाटील, मनोहर पाटील, पी.डी.महाजन, अमोल कासार, आदी ग्रामस्थांसह,
आरोग्य सहाय्यक-वाय आर पाटील, औषध निर्माण अधिकारी-विजया गावित, आरोग्य सेवक-कैलास बडगुजर, सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

No comments