भारतीय बौद्ध महासभा वर्षावास धम्म प्रवचन मालिका उदघाट्न प्रशिक बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा निमित्त वर्षावास धम्मप्रवचन मालिकाचे तालुकाध्य...
भारतीय बौद्ध महासभा वर्षावास धम्म प्रवचन मालिका उदघाट्न
प्रशिक बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा निमित्त वर्षावास धम्मप्रवचन मालिकाचे तालुकाध्यक्ष बापूराव वाणे यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
विरवाडे ता.चोपडा येथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुका व शहर शाखेच्या वतीने प्रशिक बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा निमित्त वर्षावास धम्मप्रवचन मालिकाचे तालुकाध्यक्ष बापूराव वाणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यांत आले. यावेळी त्रिशरण, पंचशील,बुद्धवंदना, भिमस्मरण,भिमस्मृती, सुत्रपठण करण्यांत आले. तसेच वर्षावासाचे महत्व या विषयावर बापूराव वाणे व सुदाम करनकाळ यांनी धम्म प्रवचन केले. तसेच दिवाणजी साळुंखे चुंचाळे यांनी गीतातून भगवान बुद्ध वर्षावासाचे महत्व विशद केले.वर्षावासच्या महामंगल पर्वात प्रत्येक रविवारी नियोजीत विषय पत्रिकेनुसार विचारवंत यांची धम्म प्रवचने मालिका आयोजित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास बापूराव वाणे,सुदाम करनकाळ,संजय साळुंखे,दिवाणजी साळुंखे, सुदाम ईशी,सुकदेव बाविस्कर, गौतम बाविस्कर, लक्ष्मण शिरसाठ,दिनकर बाविस्कर,संदिप सैदाणे,सुनिल शिरसाठ,धनंजय सोनवणे,नवल शिरसाठ,प्रितम बिऱ्हाडे,हेमराज शिरसाठ, राज सोनवणे,राज बाविस्कर,दिपक सोनवणे,आदी बौद्ध उपासक,उपासिका श्रामणेर,बौद्धाचार्य उपस्थित होते.वर्षावास कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांनी केले.

No comments