adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

४५०००कोटी न मागता जर लाडक्या भगिनींना मिळत असेल, मग ७.५ हॉर्स पॉवर वरील शेती पंपा चे वरील वीज बिल वाले आत्महत्या करणाऱ्या भाऊंनी काय घोडे मारले

४५०००कोटी न मागता जर लाडक्या भगिनींना मिळत असेल, मग ७.५ हॉर्स पॉवर वरील शेती पंपा चे वरील वीज बिल वाले आत्महत्या करणाऱ्या भाऊंनी काय घोडे...

४५०००कोटी न मागता जर लाडक्या भगिनींना मिळत असेल, मग ७.५ हॉर्स पॉवर वरील शेती पंपा चे वरील वीज बिल वाले आत्महत्या करणाऱ्या भाऊंनी काय घोडे मारले 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

 ४५०००कोटी न मागता जर लाडक्या भगिनींना मिळत असेल, मग ७.५ हॉर्स पॉवर वरील शेती पंपा चे वरील  वीज बिल वाले आत्महत्या करणाऱ्या भाऊंनी काय घोडे मारले ,त्यांना देखील कृषी वीजबिल माफी मिळालीच पाहिजे शेतकरी कृती समितीचे पालकमंत्री मा ना गुलाबराव पाटील व मा ना रक्षा ताई खडसे यांना निवेदन....

....खानदेशात पाण्याची पातळी आधीपासूनच खोल असल्याने,शेती करणेसाठी ७.५हॉर्स पॉवर वरील कृषी पंप वापरणे ही गरज आहे,म्हणून लाखो शेतकरी  ते वापरत आहेत.त्याखालील हॉर्स पॉवर चे पंप पाणीच उपसू शकत नाही.९५%शेतकरी हे पाच एकर आतील आहेत. त्यात वीज फक्त ८तास म्हणजे जास्त पाणी उपसतील असे ही नाही.त्यामुळे वीजबिल माफी ही सरसकट अपेक्षित असताना सरकारने फक्त ७.५ एच पी वरील शेतकऱ्यांना वीजबिल माफी दिली ती इतरांवर अन्याय करणारी आहे.

     एकीकडे  कुणीही मागणी केली नाही अश्या योजनांसाठी ₹ ४५०००कोटी सरकार जाहीर करते,पण  लाखो शेतकरी आत्महत्या करीत असताना त्या शेतकऱ्यांना वाचवायचे निर्णय घेतांना अटी शर्ती लावून त्यांना मदत नाकारणे योग्य नाही.

    झालेला अन्याय दूर करणेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना गुलाबराव पाटील व केंद्रीय मंत्री मा रक्षाताई खडसे यांना निवेदन देवून शेतकरी कृती समितीने लक्ष वेधले.

  दोघेही मंत्र्यांनी आम्ही या प्रश्र्नी आधीपासूनच लक्ष ठेवून आहोत परत शेतकऱ्यांची भावना कळवणार असल्याचे आश्वासन दिले .

 यावेळी एस बी पाटील(गणपुर),भागवत महाजन(गोरगावले)प्रशांत पाटील(चहार्डी),अजित पाटील(कठोरा),अमळनेर बाजार समिती उपसभापती सुरेश पाटील(निंभोरा), प्रा सुभाष पाटील(शिरुड),नीलकंठ पाटील(ढेकू),अजित पाटील(पारगाव)डॉ रवींद्र निकम(माचला)गोपाल महाजन(चुंचाले),कुलदीप राजपूत, अंबालाल पाटील हजर होते.

No comments