माहिती अधिकार कार्यकर्ता विनोद मधुकर बोरकर यांचे शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोपातून निर्दोष मुक्तता........ नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो...
माहिती अधिकार कार्यकर्ता विनोद मधुकर बोरकर यांचे शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोपातून निर्दोष मुक्तता........
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- बुलढाणा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा येथील रहिवासी तसेच विविध कार्यालयात विविध प्रकारच्या माहित्या माहितीचा अधिकारांतर्गत मागणारे विनोद मधुकर बोरकर यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कागदपत्रांची फाडफाड केली व कर्मचारी समाधान जाधव यांना चावा घेतला प्रकरणी आरोपीची बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे ०३.०३.२०२२२ रोजी नायब तहसीलदार अमरसिंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १५१ / २०२२ नोंदविण्यात आला होता. सादर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपप्रत्र ज़िल्हा न्यायालय न्यायाधीश बुलढाणा येथे सादर करण्यात आले होते. सादरील प्रकरणात ६ साक्षी पुरावे तपासण्यात आले. परंतु तपासातील त्रुटी व संशयाचा आधारे प्रमुख सत्र न्यायाधीश बुलढाणा श्री. एस. सी. खटी साहेब यांनी विनोद बोरकर यांचे सदर आरोपातून दिनांक २५.०६. २०२४ रोजी निर्दोष मुक्तता केली. सादर प्रकरणात आरोपी तर्फे अॅड. प्रवीण वाघमारे याच्या मार्फत कामकाज पाहण्यात आले व युक्तिवाद करण्यात आले.
No comments