शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय सोनोने तर उपाध्यक्ष पदी युवराज वाघ यांची निवड नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मलकापूर (संपादक...
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय सोनोने तर उपाध्यक्ष पदी युवराज वाघ यांची निवड
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मलकापूर
(संपादक हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- तालुक्यातील लोनवडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची निवड (दि. २७) जुलै शनिवार रोजी करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी विजय सोनोने तर उपाध्यक्षपदी युवराज वाघ यांची शाळेतील विद्यार्थी पालक यांच्या उपस्थित सर्वानुमते निवड करण्यात आली.निवडीची प्रक्रिये मध्ये एकूण ७ सदस्य घेण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक खोडके सर,शिक्षक धाडे सर,शिक्षिका व विद्यार्थी पालक यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
No comments