ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेनेचा संभाजी ब्रिगेडला जाहीर पाठिंबा . पूजा खेडकर या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवा...
ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेनेचा संभाजी ब्रिगेडला जाहीर पाठिंबा . पूजा खेडकर या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-भडगाव
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भाऊ भोयर यांच्या नेतृत्वामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर पूजा खेडकर या अप्रशिक्षित आय.ए.एस अधिकारी यांच्या निलंबनाची कारवाई करावी याकरिता तीव्र आंदोलन करण्यात आले होते . यावेळी या आंदोलनाला ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा जगदीश मानवतकर सर यांनी दिलला आहे.
सविस्तर वृत्त असे की पूजा खेडेकर या अप्रशिक्षित आय.ए.एस अधिकारी असून त्यांची वाशीम येथे तडकाफडकी बदली करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे शासकीय मेडिकल सर्टिफिकेट न देता फक्त खोटे दस्तावेज लावून पूजा खेडकर या आय.ए.एस या पदापर्यंत पोहोचल्या आहेत.अशा प्रकारचा खुलासा न्यूज चैनल वर दररोज होत आहे . त्यांनी खोटे दस्तावेज लावून आणि मोठ्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून हे पद बळकावल अशा प्रकारचा निष्कर्ष सध्या तपासामध्ये निघत आहे . अशा वादग्रस्त आणि भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकाऱ्याला तात्काळ वाशिम मधून हाकलून लावावे.
पूजा खेडकर या अधिकाऱ्यावर नीलंबाची कारवाई करावी या व इतर मागण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भाऊ भोयर यांचे नेतृत्वात आंदोलन वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले होते . यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भाऊ भोयर यांना ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर सर यांनी आपले लेटर प्याड वर समर्थनाचे पत्र दिले.
तसेच भविष्यात कधीही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवायचा असेल तर आमची संघटना आणि आम्ही आपल्या सोबत राहुं अशा प्रकारचे आश्वासन यावेळी जगदीश मानवतकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना दिले .यावेळी ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख संविधान भाऊ ढोले ,वाशिम जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ इंगोले ,जिल्हा उपाध्यक्ष नितीन बांगर ,वाशिम तालुका अध्यक्ष गजेंद्र भाऊ राऊत ,तालुका उपाध्यक्ष बबनराव वाळके तसेच ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.



No comments