adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भैयासाहेब ॲड. श्री संदीप सुरेश पाटील यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या विविध समस्यांच्या निराकारणासाठी म.तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात यांची भेट

  भैयासाहेब ॲड. श्री संदीप सुरेश पाटील यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या विविध समस्यांच्या निराकारणासाठी मा.तहसीलदार ...

 भैयासाहेब ॲड. श्री संदीप सुरेश पाटील यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या विविध समस्यांच्या निराकारणासाठी मा.तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात यांची भेट


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा नगरीचे मा.नगराध्यक्ष , जिल्हा काँग्रेसचे मा. अध्यक्ष तथा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैयासाहेब ऍड. श्री संदीप सुरेश पाटील यांनी आज 22जुलै 2024 रोजी आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या विविध समस्यांच्या निराकारणासाठी मा.तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात यांची भेट घेतली.यावेळी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री भाऊसाहेब थोरात यांनी उचित स्वागत करून समस्या जाणून घेतल्या.विशेषतः मतदार यादीत कमी झालेली नावे पुन्हा यादीत घेणे,मतदार यादी अद्यायावत करणे, मतदारकेंद्रे मतदारांना जवळ राहतील याची काळजी घेणे,संजयगांधी योजनेतील पात्र लोकांना त्वरित लाभ मिळणेसाठी लक्ष घालणे,नुकसंग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करणे या आणी अशा अनेक प्रश्न सोडविणे संदर्भात  चर्चा केली.तहसीलदार श्री,भाऊसाहेब थोरात  यांनी उत्तम प्रतिसाददेत सहमती दर्शवली.यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष के. डी.  चौधरी सर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्जीव सोनवणे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समीतेचे संचालक प्रा.नंदकिशोर सांगोरे सर,अल्पसंख्यांक विभागाचे ज्येष्ठ नेते शेख आरिफ,काँग्रेसचे कार्यकर्ते देवकांत के. चौधरी यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

No comments