adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गरजवंत गरीब विद्यार्थीनींना "टी शर्ट" वाटप करून श्रीमती सुमनबाई कानडेंचा वाढदिवस साजरा..

  गरजवंत गरीब विद्यार्थीनींना "टी शर्ट" वाटप करून श्रीमती सुमनबाई कानडेंचा वाढदिवस साजरा..  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा (...

 गरजवंत गरीब विद्यार्थीनींना "टी शर्ट" वाटप करून श्रीमती सुमनबाई कानडेंचा वाढदिवस साजरा.. 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर असणाऱ्या श्रीमती सुमनबाई गुलाबराव कानडे व कु.मन्नू विजय कानडे या आजी नातवाच्या गोड जोडीचा वाढदिवस घरगुती वातावरणात साजरा न करता आदिवासी विद्यार्थींनींमध्ये जाऊन साजरा करण्याचा अनोखा योग  चोपड्यात  घडून आला.राम कलेक्शनचे संचालक संजयजी कानडे यांच्या दूरदृष्टीने व दातृत्वशाली विचारांनी अत्यंत गरजू गरजवंत विद्यार्थिनींना वस्त्र दानाने व केक कापून  हा समाजोपयोगी  कार्यक्रम सोत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


संजय कानडे यांनी आपल्या आईचा ७८ वा व पुतण्या मन्यू चा वाढदिवस गरजूंना मोलाचा हात देऊन साजरा करावा या उदात्त हेतूने शहरातील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह गाठून आदिवासी निकडवंत विद्यार्थींना टी शर्ट देऊन केक कापून साजरा केला.

यावेळी वस्तीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ,ओम संजय कानडे,धनश्री संजय कानडे,  राम अजय कानडे, लक्ष्मी विजय कानडे, तपस्या विजय कानडे, कृष्णा विजय कानडे , अधिक्षिका कावेरी कोळी , कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments