adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रिपाईच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी संजय भैलुमेच ना.आठवलेंकडून शिक्कामोर्तब

  रिपाईच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी संजय भैलुमेच  ना.आठवलेंकडून  शिक्कामोर्तब अहमदनगर (सचिन मोकळ) (संपादक :- हेमकांत गायकवाड) अहमदनग...

 रिपाईच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी संजय भैलुमेच  ना.आठवलेंकडून  शिक्कामोर्तब


अहमदनगर (सचिन मोकळ)

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

अहमदनगर :- गेल्या आठवड्यात रीपाई (आठवले) पक्षाची बैठक घेऊन जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव,राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे दि.२३ ऑगस्ट रोजी मुंबई येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांची जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी भेट घेतली या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे,जिल्हा कार्याध्यक्ष विलास साठे सर,मा.शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे,युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे,पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे,कर्जत तालुकाध्यक्ष नागेश घोडके,कर्जत आय टी सेल तालुकाध्यक्ष रमेश आखाडे,जामखेड तालुकाध्यक्ष प्रमोद सदाफुले,भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे,युवक जिल्हा सरचिटनिस दया गयभिये आदी कार्यकर्ते भेटून त्यांना जिल्ह्याचा व लोकसभा निवडणुकीचा अहवाल सविस्तर देण्यात आला,त्यामध्ये संजय भैलुमे यांची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी संजय भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सर्व कार्यकारिणी कायम असून सुनिल साळवे यांची विधानसभा निवडणुकी साठी जिल्हा प्रभारीपदी निवड झाली असल्याची त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्याचे रिपाईचे जिल्हाध्यक्ष म्हणून संजय भैलुमे हेच आहे याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

पक्षाची सभासद नोंदणी चालू असून ज्या कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी केलेली नाही त्यांनी सभासद नोंदणी केल्याशिवाय त्यांना पक्षाचे सक्रिय सभासद होता येणार नाही हे स्पष्ट केले.त्याच वेळी शिष्टमंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी दक्षिण व उत्तर साठी वेगवेगळे दोन संपर्कप्रमुख मिळावेत अशी जोरदार मागणी शिष्ट मंडळाने केली या मागणीला ना.आठवले साहेब अनुकुलता दर्शवली.वरिष्ठ नेते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करत असतात तरी कार्यकर्त्यांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी जिद्दीने काम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांनी केले.

No comments