स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा निर्णय बुलढाण्यात जिल्हा व तालुका कार्यकारणी बरखास्त. प्रा.प्रकाश पोफळे अमोल बावस्कार :- विशेष प्रतिनिधी ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा निर्णय
बुलढाण्यात जिल्हा व तालुका कार्यकारणी बरखास्त.प्रा.प्रकाश पोफळे
अमोल बावस्कार :- विशेष प्रतिनिधी बुलढाणा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा :- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बुलढाणा जिल्ह्य व तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती २४ ऑगस्ट २०२४ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उच्च अधिकार समितीचे प्रमुख प्रा. प्रकाश पोपळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना दिली आहे. मा.खा. राजु शेट्टी संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे प्रा.पोपळे यांनी सांगितले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर नवीन चेहऱ्यांना संघटनेची जबाबदारी देण्यात येणार असून सदर जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी मा.खा.राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जिल्हा बैठक आयोजित करुन नव्याने जाहीर करण्यात येईल. अशी माहिती प्रा. प्रकाश पोपळे यांनी प्रसिद्ध पत्रकातुन प्रसार माध्यमांना दिली आहे.
No comments