पाल कृषी विज्ञान केंद्र रानभाजी महोत्सव आयोजन समाजामध्ये जंगलातील रानभाज्या विषयी महत्व समजावे व त्याचा वापर आपल्या आहारात व्हावा यासाठी ज...
पाल कृषी विज्ञान केंद्र रानभाजी महोत्सव आयोजन
समाजामध्ये जंगलातील रानभाज्या विषयी महत्व समजावे व त्याचा वापर आपल्या आहारात व्हावा यासाठी जनजागृती
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो रावेर :- मोहसीन तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील पाल कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी विभाग, जळगांव (महाराष्ट्र शासन) तालुका कृषी अधिकारी रावेर/यावल यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
दि.१४ ऑगस्ट २०२४ रोजी फैजपूर येथे तालुकास्तरीय रणभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला.
समाजामध्ये जंगलातील रानभाज्या विषयी महत्व समजावे व त्याचा वापर आपल्या आहारात व्हावा यासाठी जनजागृती होण्याच्या हेतून सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमास आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी रानभाज्या विक्रीस आणल्या होत्या तसेच महिला गटांनी विविध रानभाजीचे प्रदर्शन केले होते.
या प्रसंगी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी देखील महोत्सवात सहभागी होवून रणभजी बद्दल महत्व समजून घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.श्रीमती.अरूनाताई चौधरी यांनी रान भाजी बाबत मार्गदर्शन केले.या प्रसंगी व्यासपीठावर डॉ.गीता चौढरी,अशोक झांबरे(अध्यक्ष,सातपुडा विकास मंडळ पाल)अजित पाटील( सचिव सातपुडा विकास मंडळ पाल)भाऊसाहेब वाळके(तालुका कृषी अधिकारी रावेर)प्रा.महेश महाजन (प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र पाल) डॉ.जी पिं पाटील(माजी प्राचार्य) महंत पवन महाराज,
फैजपूर अतुल पाटील (शास्त्रज्ञ)सागर सिनारे (मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार(मंडळ कृषी अधिकारी)मयूर भामरे(मंडळ कृषी अधिकारी) ढले (मंडळ कृषी अधिकारी),शरद वाणी तसेच उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, सकेगांव,कृषी महाविद्यालय,मुक्ताईनगर, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्तावना प्रा.महेश महाजन यांनी केली तर सूत्रसंचाल सचिन गायकवाड (कृषी पर्यवेक्षक ) यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.






No comments