सावदा शहरात विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिवस साजरा दि.१५ ऑगस्ट रोजी सर्व मराठी,उर्दु, इंग्लिश मीडियम शाळा,कॉलेज सावदा पोलिस स्टेशन,नग...
सावदा शहरात विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिवस साजरा
दि.१५ ऑगस्ट रोजी सर्व मराठी,उर्दु, इंग्लिश मीडियम शाळा,कॉलेज सावदा पोलिस स्टेशन,नगरपालिका,सार्वजनिक बांधकाम विभाग,सावदा वीज वितरण कार्यालय विविध संस्था मध्ये संबंधित अधिकारी व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस मोठ्या हर्ष उल्हासने साजरा
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- रावेर मोहसीन तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
सावदा :- सावदा शहरात दि.१५ ऑगस्ट रोजी सर्व मराठी,उर्दु, इंग्लिश मीडियम शाळा,कॉलेज सावदा पोलिस स्टेशन,नगरपालिका,सार्वजनिक बांधकाम विभाग,सावदा वीज वितरण कार्यालय विविध संस्था मध्ये संबंधित अधिकारी व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस मोठ्या हर्ष उल्हासने साजरा करण्यात आला.शहरात शहीद अब्दुल हमीद स्मारकावर माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे सह अधिकारी व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.बस स्टेशन परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ १०८ फुटी उंच ध्वजस्तंभावर आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दिवंगत स्वातंत्र्य सैनिक प्रेमचंद नथू महाजन यांचे सुपुत्र दत्तर प्रेमचंद महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,प्रियदर्शनी सरोदे,नंदाताई लोखंडे,सुब्द्रा बडगे,शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी,सपोनि विशाल पाटील मुख्याधिकारी भूषण वर्मा एनसीसी कॅडेट विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग व पालिका कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीचा जागर
"यानंतर शहरात हजरत सादीक शाह वली दर्गाच्या परिसरात १५ ऑगस्ट रोजी आकर्षण सजावट व तिरंगा ध्वज लावून मुस्लिम नवजवान कमेटी चांदनी चौक तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ.हमीद शेख,डॉ.अनसार खान, डॉ.नासीर,डॉ.लियाकत कुरैशी सह डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष डॉ.हाजी हारून सेठ,उद्योजक शब्बीर हुसैन अख्तर हुसैन यांचे चिरंजीव(सीए) पदवीधर जाफर सेठ,सपोनि विशाल पाटील,डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्या अजमल सर मा.नगरसेवक गुड्डू सेठ,जेष्ठ पत्रकार युसूफ शाह व फरीद शेख यांचा कमेटी सदस्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.येथे विद्यार्थ्यांनी आयशा बी निसार अहमद व शेख उमर फारुख यांनी त्यांच्या सुंदर आवाजात देशभक्तीवर आधारित गीत म्हटले यानंतर देशासाठी विना शर्त बलिदान देणारे शहीदांना पत्रकार फरीद शेख यांनी"सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा" या गीताने खिराजे अकीदत सादर केली.यावेळी मन्यवरांसह नागरिक विद्यार्थी आसन सोडून गीत संपेपर्यंत उभे होते.यामुळे देशभक्तीमय वातावरणात अधीक भर पडली.यानंतर सपोनि विशाल पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हारून सेठ यांनी मनोगत व्यक्त करताना आपला देश कसा स्वातंत्र्य झाला यावर प्रकाश टाकून,शिक्षण शिवाय प्रगती नाही.ही गोष्ट देखील उपस्थित नागरिक व पालकांसह विद्यार्थ्यांना येथे पटवून दिली. कार्यक्रमची सांगता कलीम जनाब यांनी राष्ट्रगीताने केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निसार अहमद,समद गुलाब,मोईन लाला गृप व नवजवान कमेटी चांदनी चौक सदस्यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन पत्रकार फरीद शेख तर आभार सादीक मिस्तरी यांनी मानले.

No comments