यश जिद्द चिकाटीच्या जोरावर स्वतः ला सिध्द करून दाखविले प्रशांत बोरसे यांचा आज वाढदिवस या निमित्ताने आमचे लाडके भाचे प्रशांत बोरसे यांचा ...
यश जिद्द चिकाटीच्या जोरावर स्वतः ला सिध्द करून दाखविले
प्रशांत बोरसे यांचा आज वाढदिवस या निमित्ताने
आमचे लाडके भाचे प्रशांत बोरसे यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने
बालपणापासून मि प्रशांतला पाहतोय अगदी जवळून आम्ही प्रेमाने आण्णा म्हणायचो सर्वांचा आवडता आण्णा म्हणजे आजचा प्रशांत वडिल अशोक बोरसे आपल्या कुटुंबाचा रहाट गाडा आपल्या टेलरिंग च्या माध्यमातून चालवायचे सोबत प्रशांतची आई रुखमाताई यांची साथ ह्या सुखी संसाररुपी वेलीवर दोन मुली दोन मुल ही फुले जन्माला आली एक नंबर वैशाली (वैशू) तर दोन नंबर प्रशांत तिन नंबर स्वाती व चार नंबर हर्षल अशा परीवार हळूहळू आण्णा आपले शिक्षण गावात १२वी पर्यंत पूर्ण करून चोपडा कॉलेजला शिक्षण घेता घेता कधी गुजरात मधील सुरत कडे वडला ते कळालच नाही हाती मिळेल ते काम करीत आपल्या वडिलोपार्जित सलुन व्यवसायात उतुंग अशी भरारी घेतली व डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या सलून व्यवसाय मोठ यश मिळवत.
आज प्रशांत बोरसे असे नाव झाले कि या नावाची ओळख देण्याच कामच नाही उमरगाव (गुजरात) मध्ये स्वतः चा बॉलिवूड लेडीज & जेंडस स्टुडिओची उभारणी केली व वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावत मदत केली मग सुप्रसिद्ध हेअर स्टाईलीस्ट जावेद हबीब यांचेकडे बडोदा अहमदाबाद येथे ट्रेनिंग घेवून आपल्या लेडिज & जेंडस स्टुडिओला यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले नुकताच प्रशांत बोरसे यांना सुप्रसिद्ध हेअर स्टाईलीस्ट जावेद हबीब यांचे कडून एका समारंभात सुपरस्टार हेअर स्टाईलीस्ट म्हणून गौरविण्यात आले प्रशांत बोरसे यांनी उमरगाव येथे जिवा सेना तालुका अध्यक्ष म्हणून गेल्या काही वर्षांपासून या पदाची धुरा सांभाळली असून त्यांच्या परिचयात असंख्य सिनेसृष्टीतील कलाकार त्यांचे सहकारी मित्र पण आहेत . व सामाजिक क्षेत्रातही मोठं नावलौकिक आहेत. आपल्या बोरसे परिवारात मोठा नाव कमावण्याच्या धाडस त्यांनी करून दाखवला आहे. त्यांच्या गावापासूनचा तर शहरापर्यंतच्या प्रवास खूप अवघड राहिला आहे. कित्येक दिवस छोट्या-मोठ्या दुकानात कारागीर म्हणून काम करत रस्त्यावर राहत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवला की परिस्थिती कशीही असो माणसाने हिम्मत हरायचे नसते. जो सतत प्रयत्न करत असतो त्याच्या विजय एक दिवस नक्कीच असतो. नाव एक दिवसात मोठं होत नसतं त्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागतात. सलग दोन वर्षाची मेहनत वडापाव वर दिवस काढून त्यांनी प्रोफेशनल काम शिकून स्वतःला सिद्ध करून दाखवला. त्यांना उमरगाव पासून तर सुरत गुजरातमध्ये समाज भूषणही पुरस्कार मिळाले आहेत यात परिवाराचे समाजाचे गावाचे नावलोकिक झाले आहे.
आज प्रशांत बोरसे यांचा वाढदिवस त्यांना भगवंत यश सुख समृद्धी उत्तम आरोग्य देवो हिच प्रभु चरणी प्रार्थनाशब्दांकन
शामसुंदर सोनवणे
नेशन महाराष्ट्र
व्यवस्थापकीय संपादक
मो.8208449983
No comments