चोपडा नगर परिषदेस मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व रस्ते दुरुस्तीसाठी चोपडा काँग्रेस चे निवेदन नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो...
चोपडा नगर परिषदेस मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व रस्ते दुरुस्तीसाठी चोपडा काँग्रेस चे निवेदन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
आज दिनांक १६/८/२०२४ रोजी चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने चोपडा शहरात मोकाट गुरे व कुत्र्यांचा प्रचंड वावर असून नागरिकांना त्याच्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तसेच मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची ही अवस्था झालेली आहे तरी याकडे नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून त्यावर तात्काळ कारवाई होणे गरजेचे असताना यापूर्वीही अनेकदा लेखी व तोंडी निवेदन देण्यात आलेत परंतु त्यावर काहीही कारवाई किंवा उपाययोजना झालेली दिसून आली नाही म्हणून आज पुन्हा चोपडा नगर परिषदेत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले, निवेदनात तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप माजी शहराध्यक्ष के.डी.चौधरी सर,सुतगिरणी संचालक राजेंद्र पाटील,अनिल युवराज पाटील,रमाकांत सोनवणे,अशोकराव कदम,आरिफ सिद्दिकी ,काशिनाथ पाटील,अविनाश पाटील,दिलीप पाटील, युवराज पाटील,नरेंद्र पाटील,फातिमाताई पठाण,हमीदखाँ रशीदखाँ,मीर आबिद अली सैय्यद,महेबुब तेली,चंद्रकिरण पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments