चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट .यांच्याकडून भव्य रास्ता रोको खिचडी बनव आंदोलन---- चोपडा येथील नायब तहसीलदरांना निवे...
चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट .यांच्याकडून भव्य रास्ता रोको खिचडी बनव आंदोलन----
चोपडा येथील नायब तहसीलदरांना निवेदन देऊन संपन्न.
प्रतिनिधी चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा- यावल. चोपडा तालुक्यातले खेडो पाड्यातले रस्त्याच्या प्रश्न मागील दहा वर्षापासून जैसे ते अवस्थेत आहे तालुक्याचे लोक प्रतिनिधी नेहमी वापरतात पण गड्ड्यांची जाणीव कधी कोणाला झाले नाही, दिवसातून यावल ते चोपडा अंतराने दहा ते पंधरा एक्सीडेंट ह्या खड्ड्यांमुळे होत असतात.खड्डे वाचवताना जास्त जीव बळी जातात, तसेच शेतकरी वर्ग या रस्त्याने नेहमी आपला शेतमाल. तालुक्याच्या मार्केटपर्यंत. घेऊन जाता येत नाही. रस्त्याने ॲम्बुलन्स जाते गर्भवती महिला असेल कुणी एक्सीडेंट च्या पेशंटअसेल.यांना जेथे दहा मिनिटेपोहोचायला लागतात. त्यांना 40 मिनिटांच्या सामना करून रस्ता पार करावा लागत आहे.या सर्व प्रश्नांचे उत्तर नेमकं मागाव तरी कोणाकडे. हा प्रश्न.चोपडा तालुक्याच्या.सर्वसाधारण जनतेला पडलेला आहे. म्हणून आज."राष्ट्रवादी काँग्रेस च्या " वतीने वर्डी ते माचला फाटा अंतर्गत एका पुलावर पडलेल्या मोठ्या गड्ड्यात. चुला तयार करुन खिचडी शिजवून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. मा विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरुणभाई गुजराथी. मा आ आदरणीय कैलास बापू."ज्योतीताई पावरा" डीपी साळूंखे सर तालुका अध्यक्ष शशी दादा पाटील.यांच्या संकल्पनेतून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनाला उपस्थित, माजी सभापती विनायकराव चव्हाण, ,चो सा का मा चेरमन नाना साहेब अतुल जी ठाकरे, तुकाराम बापू, रमाकांत जी बोरसे, रामचंद्र दादा भादले. रज्जाक काका तडवी.लहूश धनगर, डॉ भरत पाटील , डॉ कांतीलाल पाटील, राकेश पाटील, मयूर पाटील,शेखर दादा, सचिन धनगर, रामचंद्र बारेला ,नामा बारेला ,समाधान कुंभार, सुरेश पाटील, खैरनार बापू ,युवराज पाटील, बंटी नायदे, बाळू पाटील, तसेच पंचक्रोशीतील सर्व वाहनधारक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ,पदाधिकारी,कार्यकर्ते सहकारी, शेतकरी वर्ग ,विद्यार्थी वर्ग, पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.रस्त्याच्या आंदोलनात सहभागी होऊन.सरकारला आव्हाहन दिले रस्त्यांचे कामावर नुसते बोर्ड न लावता कामाची बोंब पाडा. अथवा सरकारी दप्तरांना कुलूपं लावू असा इशारा आदरणीय ज्योतीताई पावरा यांनी विद्यमान सरकार ला दिला.🙏🙏.
No comments