फैजपूरच्या दर्दमंद फाउंडेशनतर्फे लोकसेवा सप्ताहाचा समारोप. अल्पसंख्याक विकास केंद्रातर्फे १५ ते २३ ऑगस्ट दरम्यान भारताच्या ७८ व्या स्व...
फैजपूरच्या दर्दमंद फाउंडेशनतर्फे लोकसेवा सप्ताहाचा समारोप.
अल्पसंख्याक विकास केंद्रातर्फे १५ ते २३ ऑगस्ट दरम्यान भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकसेवा सप्ताहाचे आयोजन
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
फैजपूरच्या दर्दमंद फाऊंडेशनच्या वतीने असगर सखावत शेख अल्पसंख्याक विकास केंद्रातर्फे १५ ते २३ ऑगस्ट दरम्यान भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात फाऊंडेशनतर्फे दररोज सामाजिक उपक्रम राबवले जातात.
ज्यामध्ये विशेषतः १५ ऑगस्टचे उपक्रम : नेहमीप्रमाणे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी लहान मुलांच्या खेळांचे आयोजन करण्यात आले असून ४०० हून अधिक मुलांना वही, पेन, पेन्सिल, खोडरबर आदींसह खाऊ आणि शालेय साहित्य देण्यात आले. तर क्रिकेट, कबड्डी, खोखो, लंगडी, रस्सीखेच, फुटबॉल, टेनिस या खेळातील विजेत्यांना ५००/- रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. १६ ऑगस्टचे उपक्रम : १६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या योजनेचे अडीच हजारांहून अधिक फॉर्म मोफत भरून युनियन बँकेत शून्य शिल्लक खाते उघडले. तसेच, पात्र महिलांनी त्यांच्या खात्यातून त्याच ठिकाणी म्हणजेच संस्थेच्या कार्यालयातून मोफत निधी काढला. १७ ऑगस्ट उपक्रम :१७ ऑगस्ट रोजी आधार कार्ड शिबीर दोन मशिन सुरू करून बसवण्यात आल्या आणि आमच्या परिसरातील सुमारे १५० लोकांसाठी आधार कार्ड बनवण्यात आले. १८ ऑगस्टचे उपक्रम : १८ऑगस्ट रोजी गरिबांसाठी पासपोर्ट बनवण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १९ ऑगस्ट उपक्रम:लेबर कार्ड १९ ऑगस्ट रोजी आभा,आयुष्मान कार्ड, आदी कार्ड मोफत करण्यात आले. २० ऑगस्टचे उपक्रम: २० ऑगस्ट रोजी नवीन मोफत निवडणूक ओळखपत्र बनवण्यात आले. त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २१-२३ ऑगस्टचे उपक्रम : २१-२३ ऑगस्ट या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती फलक, पोस्टर लावून जनतेला देण्यात येत आहे. जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या सर्व कामाचा संपूर्ण खर्च दर्दमंद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इलियास अहमद सर आणि त्यांच्या पत्नी व सचिव मेहर निगार मॅडम यांनी केला. तर एहतेशाम शेख, मोहम्मद मुदस्सर सर, शफीक तडवी, साबीर पिंजारी, जब्बार तडवी, खिजर अहमद यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.


No comments