adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मोठा वाघोदा मुस्लिम समाजातर्फे तक्रार प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन

रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मोठा वाघोदा मुस्लिम समाजातर्फे तक्रार              प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बेताल वक्तव्...

रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मोठा वाघोदा मुस्लिम समाजातर्फे तक्रार            प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन 


मोहसीन तडवी :- रावेर प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मोठा वाघोदा मुस्लिम समाजातर्फे तक्रार             प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मोठा वाघोदा येथील मुस्लिम समाजातर्फे देण्यात आले दोन धर्मियांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने पैगम्बर मुहम्मद स.अ.व.यांच्या विषयीचे बेताल व्यक्तस्य करणारे रामगिरी महाराज यांचेवर गुन्हा नोंद करून तात्काळ कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याचे 

निवेदनकर्ते सर्व मुस्लिम नागरीक वाघोदा बु. ता. रावेर जि. जळगाव

यांनी केली आहे तसेच रामगिरी महाराज यांनी नासिक जिल्ह्यातील ता. सिन्नर मौजे पंचाने येथे एका धार्मिक कार्यक्रमात पैगम्बर मुहम्मद स.अ.व. यांच्या विषयी निराधार तथ्यहिन बेताल व्यक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडिया मध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेक अजानी युवक व्हायरल करीत आहेत. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने सर्व मुस्लीम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहे. सोबतच दोन धर्मामध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न वा प्रकारातून दिसुन येत आहे. तरी जाणीवपूर्वक धार्मीक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य करणा-या रामगिरी महाराजांवर गुन्हा नोंद करण्यात यावा व या बेताल वक्तव्याचे व्हिडीओ सोशल मिडीया मध्ये व्हायरल करणा-यांचा शोध घेवून तत्काळ कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचा ही निवेदनात समावेश आहे जर आमच्या निवेदनावर समाधान कारक कार्यवाही न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु या आदोलनातून काही अनुचित प्रकार घडल्यास याला शासन जबाबदार राहीन कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती असा इशाराही निवेदनकर्ते यांनी सावदा पोलीस स्टेशन ला दिलेल्या निवेदनातून दिला आहे निवेदनात सैय्यद नाजिम सैय्यद लियाखत मलक जैनुद्दीन मलक ईस्माईल शेख चांद शेख नबी यांचे सह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. 

           चौकट [सपोनि विशाल पाटील मुस्लिम समाज बा़धवांच्या भावनांचा आदर आहे आपल्या मागण्या वरिष्ठांकडे पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच सोशल मिडिया व स्टेटस ठेवून कायदा सुव्यवस्था बिघडवणारी कोणतीही कृत्ये आपल्याकडून होणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे]

No comments