नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव. प्रतिनिधी :- चोपडा (संपादक :- हेमकांत गायकवाड) नाशिक विभागीय ...
नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव.
प्रतिनिधी :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
नाशिक विभागीय मंडळाच्या नुकतेच वतीने आरोग्य सेवा उपसंचालक डाॅ.कपिल आहेर, व सहा.संचालक आ.से. (हिवताप) डाॅ. विवेक खतगांवकर, नाशिक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते.. ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ट सेवा देऊन कर्तव्य बजवल्याबद्दल... जळगांव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-फत्तेपुर ता-जामनेर येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती मनिषा वाकोडे,
तसेच..प्राथमिक आरोग्य केंद्र-धामणगाव, ता-जळगांव येथील आरोग्य सेवक-निलेश पाटील यांना सन २०२३-२४ साठी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.
त्याबद्दल जिल्ह्याभरातून श्रीमती मनिषा वाकोडे व निलेश पाटील यांचेवर अभिनंदनाचा तथा शुभेच्छांचा वर्षांव केला जात आहे.
श्रीमती वाकोडे व श्री निलेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की..
सदरचा पुरस्कार हा जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर साहेब आणि जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख साहेब, व सर्व अधिकारी, सहकारी यांचे वेळोवेळी मिळणारे मोलाचे मार्गदर्शनाने आम्हीं या सन्मानास पात्र ठरलो आहोत, त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले.



No comments